Lokmat Money >गुंतवणूक > पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ?

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ?

Post Office scheme : गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये १००० रुपयांसह गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:59 IST2024-12-13T12:56:59+5:302024-12-13T12:59:57+5:30

Post Office scheme : गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये १००० रुपयांसह गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे.

get pension of rs 20000 per month from this saving scheme of post office | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ?

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ?

Post Office scheme : तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणी असेल तर आता तुमची आर्थिक चिंता दूर होणार आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन एक बचत योजना चालवली जाते. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आहे. या योजनेत ८.२% दराने व्याज दिले जात आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही म्हणाला आधी का नाही सांगितलं?

तसेच ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त कर्मचारी देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या दोघांसाठी अट अशी आहे की त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल.

एफडीपेक्षा जास्त व्याज?
पोस्ट ऑफिस सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध बचत योजना ऑफर करतात. यात सरकारी हमी असल्यामुळे सुरक्षित मानल्या जातात. या योजनांवरील व्याजदर अनेक बँकांच्या एफडी दरांपेक्षा जास्त असतात. पोस्ट ऑफिसमध्येही ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी योजना आहेत. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत ही अशीच एक योजना आहे, जी ८.२% च्या आकर्षक व्याजदराची ऑफर देत आहे.

१००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना नियमित उत्पन्न, सुरक्षित गुंतवणूक आणि कर लाभांसाठी लोकप्रिय आहे. तुम्ही किमान १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकदारांना १.५ लाख रुपयांपर्यंतची करसवलत मिळते.

परिपक्वता कालावधी 
गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षे आहे. मुदतपूर्व बंद केल्यास दंड आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे SCSS खाते उघडू शकता. काही प्रकरणांमध्ये वयात सूय देण्यात आली आहे.

२०,००० रुपये पेन्शन कशी मिळेल?
SCSS योजनेत किमान गुंतवणूक १,००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपये आहे. जर तुम्ही ८.२% व्याजदराने ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक २.४६ लाख रुपये मिळतील, जे अंदाजे २०,००० रुपये मासिक आहे. व्याज १ एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीला तिमाही आधारावर दिले जाते. मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाते आणि नॉमिनीला रक्कम दिली जाते.

Web Title: get pension of rs 20000 per month from this saving scheme of post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.