Join us  

दर महिन्याच्या कमाईच्या टेन्शनपासून व्हा मुक्त; 'ही' योजना बनवेल तुम्हाला स्वतंत्र, पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 1:22 PM

सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या सर्वात पसंतीची योजना आहेत.

Post office monthly income scheme calculator: सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या सर्वात पसंतीची योजना आहेत. जर तुम्ही अशा पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक केली आणि तुम्हाला उत्तम परतावाही मिळाला, तर आणखी काय हवं? या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगत आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही दरमहा उत्तम कमाई करू शकाल.

पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम ही एक सरकारी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा व्याज मिळते. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट किंवा इंडिया पोस्ट ही योजना चालवतात. सध्या या योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळते.

POMIS मध्ये कसा मिळतो रिटर्नया योजनेत, तुम्हाला एक निश्चित रक्कम एकदाच जमा करावी लागेल आणि त्यातून तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात कमाई होत राहते. ही स्कीम ५ वर्षांत मॅच्युअर होते, त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. म्हणजेच, एकदा पैसे गुंतवून, तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते आणि नंतर योजनेच्या मुदतीनंतर, तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतात. मुदतपूर्तीनंतर, तुम्ही योजनेमध्येच संपूर्ण निधी पुन्हा गुंतवू शकता. जर मॅच्युरिटीवर योजनेतून पैसे काढले किंवा पुन्हा गुंतवले गेले नाहीत, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याज दरानुसार संपूर्ण रकमेवर व्याज मिळत राहतं.

टॅक्सचा नियम कायपोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर TDS (tax deducted at source) कापला जात नाही, परंतु तुमच्या हातात मिळणारे व्याज करपात्र आहे.

स्कीम कॅलक्युलेटरआता जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये किती गुंतवणूक करायला हवी तर तुम्ही याचं कॅलक्युलेशन करू शकता. यासाठी, तुम्ही किती रक्कम गुंतवणार हे पाहावं लागेल आणि ७.४ टक्के (वर्तमान व्याज दर) नुसार दरमहा तुम्हाला व्याज मिळेल.

५ लाखांवर किती रिटर्नजर तुम्ही या स्कीममध्ये ७.४ टक्के व्याजदरानं ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दर महिन्याला ३,०८४ रुपये व्याजापोटी मिळतील. तुम्हाला एकूण व्याजापोटी १,८५,००० रुपये मिळतील. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा