Raksha Bandhan Financial Gift Ideas: रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानला जातो. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचं मानलं जातं. यावेळी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. अशा परिस्थितीत तुमच्या बहिणीला काही आर्थिक भेटवस्तू देऊन तुम्ही तिचं भविष्य सुरक्षित करू शकता.
फिक्स्ड डिपॉझिट
फिक्स्ड डिपॉझिट ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. यामध्ये एकरकमी रक्कम जमा केली जाते. मुदतपूर्तीनंतर, रक्कम व्याजासह परत केली जाते. अशा परिस्थितीत, या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तिच्या नावावर एफडी उघडून तुमच्या बहिणीला भेट देऊ शकता. या एफडीच्या मॅच्युरिटीनंतर तुमच्या बहिणीला आर्थिक दिलासा मिळू शकतो.
एसआयपी
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे केली जाते. या योजनेत लोकांना चांगला परतावा मिळाल्याचं काही काळापासून दिसून येत आहे. एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असा परतावा सहसा इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावानं दर महिन्याला एसआयपी सुरू करू शकता. आगामी काळात या एसआयपीमुळे बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे.
सोनं
सोनं ही एक अशी भेट आहे, ज्याचं मूल्य नेहमी वेळेनुसार वाढतं आणि वाईट काळात ते खूप उपयुक्तही ठरू शकतं. या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला सोन्याची वस्तू गिफ्ट करू शकता. दागिने प्रत्येक बहिणीलाच आवडतात. अशा परिस्थितीत, तिला तुमची भेटवस्तू खूप आवडेल. जर तुमचं बजेट खूप जास्त नसेल तर तुम्ही या निमित्तानं तुमच्या बहिणीला सिल्व्हर नोटही भेट देऊ शकता.
हेल्थ इन्शुरन्स
तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीलाही या निमित्तानं तिच्या आरोग्याचं रक्षण करणारी भेटवस्तू देऊ शकता. तुम्ही त्याच्या नावावर हेल्थ इन्शुरन्स विकत घेऊ शकता. आजच्या काळात आपल्यासमोर कोणतीही आरोग्याची समस्या कधी येईल हे कोणालाच ठाऊक नसतं. परंतु आवश्यकता असताना हेल्थ इन्शुरन्स खूप उपयुक्त ठरू शकतो.
(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)