Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rates Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरानं विक्रमी पातळी गाठली होती. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:16 PM2024-10-24T15:16:38+5:302024-10-24T15:16:38+5:30

Gold Silver Rates Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरानं विक्रमी पातळी गाठली होती. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

gold and silver down silver becomes cheaper by Rs 1442 Check the latest rate before buying diwali gold buying | Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rates Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरानं विक्रमी पातळी गाठली होती. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३१ रुपयांनी घसरून ७८,१६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव १४४२ रुपयांनी घसरून ९७४२० रुपये प्रति किलो झाला आहे.

सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

जानेवारीत सोन्याचा भाव ६३३५२ रुपये

यावर्षी सोनं १४८०९ रुपये प्रति १० ग्रॅमनं महागले आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३३५२ रुपये होती. मात्र, या काळात चांदी ७३३९५ रुपयांवरून ९७४२० रुपये प्रति किलो झाली आहे. या कालावधीत त्यात २४०२५ रुपयांची वाढ झाली.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७७,८४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यामध्ये ५२८ रुपयांची घसरण झालीये. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८६ रुपयांनी कमी होऊन ७१,५९६ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ३९८ रुपयांनी कमी झाला असून तो ५८,६२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३११ रुपयांनी घसरून ४५७२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ८०,५०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. यामध्ये २३३५ रुपयांचा जीएसटी आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ८०१८३ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २३३५ रुपयांची भर पडलीये. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७३,७४३ रुपयांवर पोहोचलंय. यात २१४७ रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव १००३४२ रुपयांवर पोहोचलाय.

Web Title: gold and silver down silver becomes cheaper by Rs 1442 Check the latest rate before buying diwali gold buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.