Gold Silver Price Today 11 November: १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विवाहांच्या मुहुर्तांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३५५ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ७७,०२७ रुपयांवर खुला झाला. चांदीच्या दरात आज ७०० रुपयांची घसरण झाली. हा दर आयबीएचा आहे, ज्यावर जीएसटीचा समावेश नाही. आज चांदीचा भाव ९०,८३३ रुपये प्रति किलो ग्रॅम वर उघडला.
१४ ते २३ कॅरेटचा दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ३५३ रुपयांनी कमी होऊन ७६,७१९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १२५ रुपयांनी कमी होऊन ७०,५५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज २६७ रुपयांनी कमी झाला असून तो ४७,७७० रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २०८ रुपयांनी घसरून ४५,०६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर
जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७९,३३७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २३१० रुपये जीएसटीशी संबंधित आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७९,०२० रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २३०१ रुपयांची भर पडलीये. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७२,६७३ रुपयांवर पोहोचलं. यात २११६ रुपये जीएसटी म्हणून जोडलेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९३,५५७ रुपयांवर पोहोचला.