Gold Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३१६ रुपयांनी कमी झाला. आज १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,९४४ रुपये झाला आहे. यापूर्वी बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५,२६० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर या महिन्यात नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात जवळपास ५००० रुपयांची घसरण झाली आहे.
२ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,४२५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. ibjarates.com दिलेल्या माहितीनुसार, आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १२०० रुपयांनी कमी होऊन ६७,७३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याआधी १३ नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर ६८,९३८ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
चांदीची किंमत किती?
बुधवार, १४ नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज चांदीचा भाव २,१८९ रुपयांनी घसरून ८७,५५८ रुपये झाला आहे. यापूर्वी बुधवारी चांदीचा भाव ८९,७४७ रुपये प्रति किलो होता. या महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात ५,९४३ रुपयांची घसरण झाली. २ नोव्हेंबरला चांदीचा दर ९३,५०१ रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला होता.
शहरानुसार सोन्या-चांदीचे दर (Gold rate in Mumbai, Chennai, Kolkata, Delhi, Jaipur)
शहर - २२ कॅरेट सोन्याचा भाव - २४ कॅरेट सोन्याचा भाव
- दिल्ली - ७०,५९० - ७६,९९०
- मुंबई - ७०,४४० - ७६,८४०
- कोलकाता - ७०,४४० - ७६,८४०
- चेन्नई - ७०,४४० - ७६,८४०
- पुणे – ७०,४४० - ७६,८४०
- जयपूर - ७०,५९० - ७६,९९०
- अहमदाबाद - ७०,४९० - ७६,८९०
(रु. प्रति १० ग्रॅम)