Lokmat Money >गुंतवणूक > Gold: तुमच्याकडेही घरी पडून आहे सोनं? अशी करा बंपर कमाई, या कंपनीनं सुरू केलीय जबरदस्त स्कीम

Gold: तुमच्याकडेही घरी पडून आहे सोनं? अशी करा बंपर कमाई, या कंपनीनं सुरू केलीय जबरदस्त स्कीम

Digital Gold: आपल्या देशात गुंतवणुकीसाठी सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. कुणाकडे कमी तर कुणाकडे अधिक असेल पण सोनं हे प्रत्येकाकडे असतंच. मात्र जर तुमच्याकडे डिजिटल गोल्ड असेल तर तुम्ही बऱ्यापैकी कमाई करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:22 PM2022-10-19T16:22:33+5:302022-10-19T16:23:11+5:30

Digital Gold: आपल्या देशात गुंतवणुकीसाठी सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. कुणाकडे कमी तर कुणाकडे अधिक असेल पण सोनं हे प्रत्येकाकडे असतंच. मात्र जर तुमच्याकडे डिजिटल गोल्ड असेल तर तुम्ही बऱ्यापैकी कमाई करू शकता.

Gold: Do you also have gold lying around at home? Make bumper earnings like this, this company has started a great scheme | Gold: तुमच्याकडेही घरी पडून आहे सोनं? अशी करा बंपर कमाई, या कंपनीनं सुरू केलीय जबरदस्त स्कीम

Gold: तुमच्याकडेही घरी पडून आहे सोनं? अशी करा बंपर कमाई, या कंपनीनं सुरू केलीय जबरदस्त स्कीम

मुंबई - आपल्या देशात गुंतवणुकीसाठी सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. कुणाकडे कमी तर कुणाकडे अधिक असेल पण सोनं हे प्रत्येकाकडे असतंच. मात्र जर तुमच्याकडे डिजिटल गोल्ड असेल तर तुम्ही बऱ्यापैकी कमाई करू शकता. हो तुम्ही डिजिटल गोल्ड लीजवर देऊन कमाई करू शकता. ऑनलाइन डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म सेफगोल्डकडून गोल्ड लीजिंग प्लॅटफॉर्म Gains आणण्यात आला आहे. त्याच्याकडून सादर केलेल्या स्किममध्ये तुम्ही तुमच्याकडील डिजिटल गोल्ड लीजवर देऊन कमाई करू शकता. 

डिजिटल गोल्ड लोन फिक्स टेन्योरसाठी असते आणि तुम्हाला डिजिटल गोल्डवर भाडंही मिळतं. ते यील्डच्या रूपात मिळतं. यील्डचं देय तुम्हाला सोन्याच्या रूपात मिळतं. जे खातेदाराच्या सेफगोल्ड अकाऊंटमध्ये जमा केलं जातं. एवढंच नाही तर तुम्ही हे सोनं गरज पडल्यावर कधीही विकू शकता.  त्याची विक्री केल्यावर पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातात.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गोल्ड लिजिंग अंतर्गत तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्याकडील सोनं जवाहीर किंवा दागिने निर्माण करणाऱ्यांना लीजवर देऊ शकता. या सोन्याचा वापर वर्किंग कॅपिटल म्हणून करतील. निर्धारित वेळेनंतर लीजवर घेणारी व्यक्ती मोबदल्याचा भरणा हा सोन्यासोबत करेल. सध्या ही स्कीम सेफगोल्डमधून डिजिटल सोनं घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. घरात ठेवलेल्या सोन्यावरही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

या योजनेंतर्गत किमाव ०.५ ग्रॅम आणि कमाल २० ग्रॅम डिजिटल गोल्ड लीजवर घेता येऊ शकतं. लीजची कालमर्यादा ही ३० दिवसांपासून ३६४ दिवसांपर्यंत असते. गोल्ड लीजिंग ऑफरमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांकडे स्वत:चं पॅनकार्ड असणं आवश्यक आहे.  

Web Title: Gold: Do you also have gold lying around at home? Make bumper earnings like this, this company has started a great scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.