Join us

शेअर बाजार कितीही कोसळला तरी टेन्शन नाही; 'या' गुंतवणूकदारांचा नफा वाढतच जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:46 IST

Investment Ideas : सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात स्थिर परतावा देणारा पर्याय शोधत असाल. तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहेत. आज आम्ही अशाच एका पर्यायाची माहिती देणार आहोत.

Investment Ideas : भारतीय शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी सध्या बुरे दिन सुरू आहे. फक्त स्टॉक मार्केटच नाही तर म्युच्युअल फंडात एसआयपी करणारेही चिंतेत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. सध्याच्या घसरणीत बहुतेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लाल झाले आहेत. मात्र, काही गुंतवणूकदारांवर शेअर बाजार कोसळण्याने काही फरक पडला नाही. उलट अशा परिस्थितीतही त्यांना चांगला परतावा मिळत आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.

गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षाभारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेन्सेक्सने ८५,९७८.२५ अंकांचा आजीवन उच्चांक गाठला होता, तर निफ्टी ५० नेही त्याच दिवशी २६,२७७.३५ अंकांचा आजीवन उच्चांक गाठला होता. मात्र, आजच्या घडीला निफ्टी २२ हजारांवर खाली घसरला आहे. बाजारातील सततच्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार मेटाकुटीला आले असून त्यांच्या संयमाची परीक्षा सुरू आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार कमी जोखमीत चांगला परतावा देणारी योजना शोधत आहेत.

गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ हा उत्तम पर्यायजर तुम्ही शेअर बाजारातील सततच्या घसरणीने चिंतेत असाल आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) हा एक चांगला पर्याय असू शकतो. गोल्ड ईटीएफ हा एक खास प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. त्याचे एक युनिट २४ कॅरेट सोन्याच्या १ ग्रॅम इतके आहे. त्याची खरेदी आणि विक्री देखील शेअर बाजारात होते. सोन्याच्या किमतीसोबत गोल्ड ETF ची किंमतही कमी-जास्त होत राहते. पण, इतर शेअर्सच्या तुलनेत सोन्याच्या किमती स्थिर राहतात. गेल्या महिन्याभरातील आकडेवारी पाहिली तर सोन्यात जवळपास ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

घडणावळ आणि जीएसटीचा त्रास नाहीगोल्ड ईटीएफमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. फिजिकल गोल्डप्रमाणे तुम्हाला गोल्ड ETF वर मेकिंग चार्जेस किंवा GST भरावा लागणार नाही. सोन्याचा भाव वधारल्यानंतर तुम्ही सोन्याचा ईटीएफ विकल्यास तुम्हाला प्रत्यक्ष सोने मिळत नाही. पण, त्याची समतुल्य रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. गोल्ड ईटीएफमध्ये व्यापार करण्यासाठी, तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

शेअर बाजारात घसणर सुरुच..आजही भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी ११.४३ पर्यंत, सेन्सेक्स २८०.८४ अंकांनी घसरून ७५,६५८.३७ अंकांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, निफ्टी ५० देखील ८३.७५ अंकांच्या घसरणीसह २२,८४५.५० अंकांवर व्यवहार करत आहे.

टॅग्स :शेअर बाजारसोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजगुंतवणूक