Join us

Gold-Silver Price Today: सोन्याची चमक झाली कमी, चांदीही एका दिवसात २९३० रुपयांनी घसरली; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:52 IST

Gold Silver Price Today 17 Feb: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पाहा काय आहे आजचे लेटेस्ट दर.

Gold Silver Price Today 17 Feb: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १०३९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. चांदीच्या दरात मात्र एका दिवसात २९३० रुपयांची घसरण झाली. आज १७ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १०३९ रुपये प्रति १० ग्रॅमनं घसरून ८४,९५९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी ९५,०२३ रुपये प्रति किलोवर आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

या घसरणीनंतरही यंदा आतापर्यंत सोनं ९२१९ रुपयांनी तर चांदी ९००६ रुपयांनी महागच आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १०३५ रुपयांनी घसरून ८४,६१९ रुपये झालाय. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ९५२ रुपयांनी कमी होऊन ७७,८२२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ७८० रुपयांनी कमी होऊन ६३,७१९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ६०८ रुपयांनी कमी होऊन ४९,७०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

फेब्रुवारीत उच्चांक

फेब्रुवारी महिन्यात सोन्यानं इतिहास रचला होता. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८३,०१० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. दुसऱ्या  दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८४,६५७ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आणि ६ फेब्रुवारीला पुन्हा नवा इतिहास रचला. ६ फेब्रुवारी रोजी सोन्यानं ८४,६७२ रुपयांचा नवा उच्चांक गाठला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीला सोन्यानं पुन्हा ८४,६९९ चा उच्चांक गाठला.

त्यानंतर १० फेब्रुवारीला सोन्यानं ८५,६६५ चा आणखी एक नवा उच्चांक गाठला. ११ फेब्रुवारी रोजी सोन्यानं आणखी एक इतिहास रचला आणि ८५,९०३ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८६,०८९ रुपयांचा उच्चांक गाठला.

टॅग्स :सोनंचांदी