Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर! अजूनही कमाईची संधी; कशी करता येईल गोल्डमध्ये गुंतवणूक

सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर! अजूनही कमाईची संधी; कशी करता येईल गोल्डमध्ये गुंतवणूक

Gold Price Forecast: सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी तेजीचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या सोन्याच्या किमती जागतिक आणि देशांतर्गत उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा तुम्हीही फायदा उचलू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:02 PM2024-09-25T17:02:44+5:302024-09-25T17:03:19+5:30

Gold Price Forecast: सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी तेजीचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या सोन्याच्या किमती जागतिक आणि देशांतर्गत उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा तुम्हीही फायदा उचलू शकता.

gold price forecast investment in gold etf can give bumper return as price is skyrocketing | सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर! अजूनही कमाईची संधी; कशी करता येईल गोल्डमध्ये गुंतवणूक

सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर! अजूनही कमाईची संधी; कशी करता येईल गोल्डमध्ये गुंतवणूक

Gold Price Forecast : यावर्षी सोने खूपच चमकत आहे. गेल्या काही दिवसांपासून अपवाद वगळला तर सोन्याचे भाव चढेच राहिले आहेत. सणासुदीच्या आधीच सोन्यात विक्रमी वाढ झाली आहे. पिवळा धातू लवकरच ७८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या वर्षी परताव्याच्या बाबतीत सोन्याने शेअर्सलाही मात दिली आहे. अजूनही वेळ गेली नसून सोन्याच्या तेजीचा फायदा उचलण्याची संधी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. चला जाणून घेऊया सोन्याने किती आणि कशी कमाई करू शकतो.

सोने ७८ हजारांच्या पुढे जाणार?
MCX वर फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सध्या सोन्याचा भाव ७५ हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये दुपारी ३ वाजता सोन्याचा भाव ०.१५ टक्क्यांनी वाढून ७५,११५ रुपयांवर होता. त्याआधी सोन्याने ऐतिहासिक उच्चांक नोंदवला असून इंट्राडेमध्ये ७६ हजारांची पातळी ओलांडली आहे. सणासुदीच्या दिवसात खरेदी वाढणार असून सोने ७८ हजार रुपणांचा टप्पा ओलांडणार असल्याचे मत विश्लेषकांचे मत आहे.

सोन्याचा रेकॉर्डब्रेक
CNBC TV18 च्या अहवालानुसार, मंगळवारी अमेरिकन बाजारात स्पॉट सोन्याची किंमत २,६३८.३७ डॉलर प्रति औंस या नवीन उच्चांकावर पोहोचली. तर यूएस सोन्याचा वायदेबाजारातील भाव प्रति औंस २,६६१.६० वर गेला होता. मंगळवारीही भारतीय बाजारात सोन्याने उच्चांक गाठला होता. अहवालानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव काल ७६,३३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता.

फिजिकल सोने खरेदीचे तोटे
सोन्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत - एक डिजिटल आणि दुसरा फिजिकल. अनेक लोक भौतिक सोन्याच्या भावनिक मूल्यामुळे पसंती देतात. परंतु, डिजिटल सोने खरेदी करणे गुंतवणुकीसाठी योग्य मानले जाते. फिजिकल सोन्याला चोरीचा धोका आहे. शिवाय सांभाळणेही कठीण आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण बँक लॉकरचा वापर करतात. त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. विक्री करताना दुसरा सर्वात मोठा तोटा म्हणजे शुल्क आणि भेसळ इत्यादीच्या नावाखाली कपात करणे. डिजिटल सोने या दोन्ही समस्येवर उपाय आहे.

बंद होऊ शकतात सुवर्णरोखे
यामुळेच अलिकडच्या वर्षांत सोन्याच्या गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम म्हणून सुवर्णराखे अर्थात सॉवरेन गोल्ड बाँड उदयास आले आहे. मात्र, आता हा पर्याय बंद करणार असल्याची चर्चा आहे. ऑगस्टमध्ये, सरकारी सूत्रांचा हवाला देत विविध माध्यमांनी सांगितले की सरकार SGB योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. सरकार ही योजना महागडी आणि गुंतागुंतीची मानत आहे. या कारणास्तव, सॉवरेन गोल्ड बाँड बंद करण्याचा विचार केला जात आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे
सॉवरेन गोल्ड बाँड बंद झाला तर गुंतवणूकदारांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ईटीएफ हा एक उत्तम पर्याय उरतो. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. गोल्ड ईटीएफ युनिट्स डिमॅट खात्यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्सप्रमाणे ठेवता येतात. BSE आणि NSE वर याचे व्यवहार होतात. याचा अर्थ ट्रेडींग सत्रात हे कधीही खरेदी आणि विकले जाऊ शकतात. गोल्ड ईटीएफमध्ये स्टोरेजचा खर्च कमी आहे. यामध्ये शुल्क किंवा भेसळ करण्याचा कोणताही त्रास नाही. तुम्ही सोन्याच्या ईटीएफमध्ये अगदी कमी रकमेतही गुंतवणूक करू शकता.

Web Title: gold price forecast investment in gold etf can give bumper return as price is skyrocketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.