Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याची झळाळी वाढणार! २०२४ पर्यंत सोन्याचे दर जाणार ₹७०००० पार, १५ दिवसांत ₹२००० ची वाढ

सोन्याची झळाळी वाढणार! २०२४ पर्यंत सोन्याचे दर जाणार ₹७०००० पार, १५ दिवसांत ₹२००० ची वाढ

गेल्या १५ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 02:04 PM2023-12-01T14:04:26+5:302023-12-01T14:06:08+5:30

गेल्या १५ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Gold price to cross 70000 by 2024 an increase of rs 2000 in 15 days gold silver latest rates | सोन्याची झळाळी वाढणार! २०२४ पर्यंत सोन्याचे दर जाणार ₹७०००० पार, १५ दिवसांत ₹२००० ची वाढ

सोन्याची झळाळी वाढणार! २०२४ पर्यंत सोन्याचे दर जाणार ₹७०००० पार, १५ दिवसांत ₹२००० ची वाढ

नववर्ष 2024 मध्ये सोने 68000 ते 72000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेत व्याजदर कपात अपेक्षेच्या आधीच होणार असल्याच्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जवळपास सात महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहेत. भारतातही सोन्याच्या दरानं उच्चांक गाठलाय. गेल्या 15 दिवसांत सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट दर 1989 रुपयांनी वाढून 62607 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात चांदीचा भावही 3714 रुपयांनी वाढून 75934 रुपयांवर पोहोचला आहे.

मागील सत्रात 5 मे नंतरची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर गुरुवारी स्पॉट गोल्ड सुमारे 2,041.76 डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करत होते. डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकन सोन्याचा वायदा सुमारे 2,042.40 डॉलर्स प्रति औंस होता. तर सराफा बाजारात बुधवार 29 सप्टेंबर रोजी सोन्याने 62775 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला. दिल्ली सराफा बाजारात ते 63500 रुपये प्रति 10 ग्रॅम यापेक्षा जास्त दरानं विकलं गेलं.

पुढील वर्षी 2400 डॉलर्सपर्यंतचा अंदाज
“सोन्याच्या किमतीतील अस्थिरता लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि सोन्यानं गेल्या काही महिन्यांत जोरदार परतावा दिला आहे. आम्ही सोन्याबद्दल उत्साही आहोत आणि अस्थिरता कायम राहिल्यास किंमती 2,240 डॉलर्सच्या आसपास नवीन उच्चांक गाठतील अशी अपेक्षा आहे. आमचा असाही अंदाज आहे की जर मूलभूत गोष्टी मजबूत राहिल्या तर पुढील वर्षी किंमती 2,400 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात," अशी प्रतिक्रिया केडिया अॅडव्हायझरीचे प्रेसिडेंट अजय केडिया यांनी दिली.

जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी
जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी ऐतिहासिक गतीनं झाली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोन्याची मागणी (ओटीसी वगळता) वाढून 1,147 टन झाली, जी पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा 8 टक्क्यांनी अधिक आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या ताज्या रिपोर्टनुसार केंद्रीय बँकांनी वर्ष-दर-वर्ष आधारावर निव्वळ 800 टन सोने खरेदी केले आहे, जे गेल्या नऊ मधील सर्वाधिक आहे.

Web Title: Gold price to cross 70000 by 2024 an increase of rs 2000 in 15 days gold silver latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.