Gold Price Today: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी सोनं ८५ रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदी २०४ रुपयांनी घसरली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,९०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. बुधवारी सोन्याचा भाव ७१,९९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीही ८३,२०३ रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचा भाव
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ८५ रुपयांनी कमी होऊन ७१६२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मात्र, २२ कॅरेट सोन्यासाठी ६५८६९ रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील. आज त्यात दरात ७८ रुपयांची घसरण झाली आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ६४ रुपयांनी कमी झाला असून तो ५३९३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ५० रुपयांनी घसरून ४२०६७ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला.
सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची दाट शक्यता आहे.
जीएसटीसह काय आहेत दर?
जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७४,०६६ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचलाय. यामध्ये २१५७ रुपये जीएसटीचे जोडण्यात आले आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७३७६९ रुपये आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटीनुसार २१४८ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर आज ते जीएसटीसह ६७८४५ रुपयांवर पोहोचलं. यात जीएसटी म्हणून १९७६ रुपयांची भर पडली.
१६१७ रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५५५४९ रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ७५६९९ रुपयांवर पोहोचला आहे.