Lokmat Money >गुंतवणूक > Gold Price Today : दिवाळीच्या काळातच सोन्याच्या दरात मोठी घसरण, मोठ्या प्रमाणावर खरेदी करतायत लोक; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Gold Price Today : दिवाळीच्या काळातच सोन्याच्या दरात मोठी घसरण, मोठ्या प्रमाणावर खरेदी करतायत लोक; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Gold Silver Price: ऑल टाइम हाय रेटचा विचार करता, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे आपण आताही सोने खरेदी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 05:58 PM2022-10-23T17:58:33+5:302022-10-23T17:59:25+5:30

Gold Silver Price: ऑल टाइम हाय रेटचा विचार करता, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे आपण आताही सोने खरेदी करू शकता.

Gold Price Today: During Diwali itself, the price of gold has fallen significantly, people are buying on a large scale; Know the latest rate | Gold Price Today : दिवाळीच्या काळातच सोन्याच्या दरात मोठी घसरण, मोठ्या प्रमाणावर खरेदी करतायत लोक; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Gold Price Today : दिवाळीच्या काळातच सोन्याच्या दरात मोठी घसरण, मोठ्या प्रमाणावर खरेदी करतायत लोक; जाणून घ्या लेटेस्ट रेट


दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लोक सोने खरेदी करताना दिसतात. सध्या सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सुरू आहे. खरे तर, कोरोना प्रतिबंध उठल्यापासूनच सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण बघायला मिळाली आहे. पण यातच, 23 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात 10 रुपयांची किरकोळ वाढ बघायला मिळाली. मात्र, ऑल टाइम हाय रेटचा विचार करता, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे आपण आताही सोने खरेदी करू शकता.

सोन्याच्या दरात 23 ऑक्टोबरला अर्थात रविवारी किरकोळ वाढ दिसून आली आहे. गुडरिटर्न वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 24 कॅरे 10 रुपयांची वाढ झाली आहे. याच बरोबर आता सोन्याचा दर 51290 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 47010 रुपयांवर पोहोचला आहे. 22 ऑक्‍टोबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 51280 रुपये एवढा होता.

कॅरेटनुसार, सोन्याचा लेटेस्ट दर - 

  • 23 कॅरेट सोन्याचा दर 49862 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. या महिन्यात सोने 1,768 रुपयांनी स्वस्त झाले. 8 ऑक्टोबरला सोन्याचा दर 51630 रुपयांवर पोहोचला होता.
  • 22 कॅरेट सोन्याचा दर 45,857 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. या महिन्यात सोन्याच्या दरात 1,627 रुपयांची घसरण झाली आहे. 8 ऑक्टोबरला याची किंमत 47484 रुपये होती. 
  • 18 कॅरेट सोन्याचा दर 37,547 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. या महिन्यात सोन्याच्या दरात 1,332 रुपयांची घसरण झाली आहे. 6 ऑक्टोबरला सोन्याची किंमत 38879 रुपयांवर होती.  
  • 14 कॅरेट सोन्याचा दर 29,286 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या महिन्यात सोन्याच्या दरात 1,039 रुपयांची घट दिसून आली. 6 ऑक्टोबरला याचा दर 30325 रुपयांवर होता.  


जाणून घ्या महत्वाच्या शहरातील सोन्याचा दर -  

  • मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 51,290 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,010 रुपये एवढा आहे.
  • दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,450 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,150 रुपये एवढा आहे. 
  • कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 51,290 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,060 रुपये एवढा आहे.
  • चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,710 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,410 रुपये एवढा आहे.


 

Web Title: Gold Price Today: During Diwali itself, the price of gold has fallen significantly, people are buying on a large scale; Know the latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.