Join us  

Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 2:16 PM

Gold Price Today : Gold Price Today : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सराफा बाजारात आज पुन्हा त्यात तेजी दिसून आली.

Gold Price Today : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सराफा बाजारात आज १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८० रुपयांनी वाढून ७८४९५ रुपये झाला. तर दुसरीकडे चांदीच्या दरात प्रतिकिलो ७५२ रुपयांनी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.

यावर्षी सोनं प्रति १० ग्रॅम १५१४३ रुपयांनी महागलं आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३३५२ रुपये होती. मात्र, या कालावधीत चांदी ७३३९५ रुपयांवरून ९६५५२ रुपये प्रति किलो झाली आहे. या कालावधीत त्यात २३१५७ रुपयांची वाढ झाली आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४७८ रुपयांनी वाढून ७८१८१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३९ रुपयांनी वाढून ७१९०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ३६० रुपयांनी वाढला असून तो ५८८७१ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २८१ रुपयांनी घसरून ४५९२० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ८०८४९ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचलाय. यामध्ये २३५४ रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ८०५२६ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २३४५ रुपयांची भर पडलीये. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७१९०१ रुपयांवर पोहोचलं आहे. यात २१५७ रुपये जीएसटी म्हणून जोडण्यात आलेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९९५५२ रुपयांवर पोहोचलाय.

टॅग्स :सोनंचांदी