Lokmat Money >गुंतवणूक > Gold Price Today: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, चांदी ७२००० पार; पाहा काय आहेत नवे दर?

Gold Price Today: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, चांदी ७२००० पार; पाहा काय आहेत नवे दर?

शेअर बाजारानं इतिहास रचल्यानंतर सराफा बाजारानेही नवा इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:51 PM2024-03-07T14:51:19+5:302024-03-07T14:51:53+5:30

शेअर बाजारानं इतिहास रचल्यानंतर सराफा बाजारानेही नवा इतिहास रचला आहे.

Gold Price Today Gold Price at Record Level Silver corssed 72000 per kg See what the new rates | Gold Price Today: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, चांदी ७२००० पार; पाहा काय आहेत नवे दर?

Gold Price Today: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, चांदी ७२००० पार; पाहा काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 7 March 2024: शेअर बाजारानं इतिहास रचल्यानंतर सराफा बाजारानेही नवा इतिहास रचला आहे. आज गोरखपूर, दिल्ली (Gold Price Delhi), मुंबई (Gold Price Mumbai), लखनौ (Gold Price Lucknow), जयपूर (Gold Price Jaipur), इंदूर (Gold Price Indore), कोलकाता (Gold Price Kolkata), यासह सर्व शहरांमध्ये सोन्याची किमत 65000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर उघडली. आज म्हणजेच गुरुवारी 24 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 65049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली आहे. तर, आज चांदीची चमकही वाढली आहे. आज चांदीचा भाव किलोमागे 411 रुपयांनी वाढून 72121 रुपयांवर उघडला.
 

काय आहेत नवे दर?
 

आयबीजेएच्या नवीन दरांनुसार, आता सोन्यानं 5 मार्च 2024 ची आजवरची उच्चांकी पातळी मोडून 7 मार्च रोजी नवीन सार्वकालिक उच्चांकी स्तर गाठला आहे. सराफा बाजारात 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत आता 554 रुपयांनी वाढून 64789 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर, जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसशिवाय, 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 509 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 59584 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 
 

18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 417 रुपयांनी वाढला असून आता तो 48786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 14 कॅरेट सोन्याच्या दरातही 325 रुपयांची वाढ झाली आहे. आज ते 38053 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला.
 

सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केले आहेत. या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्यासाठी लागणारं शुल्क लागू नाही. त्यामुळे तुमच्या शहरात सोन्या चांदीत दरात अधिक वाढ दिसून येऊ शकते.

Web Title: Gold Price Today Gold Price at Record Level Silver corssed 72000 per kg See what the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.