Join us  

Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 2:37 PM

Gold Silver Price 14 October: दिवाळीपूर्वीच आज सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले असून सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठला आहे. पाहूया १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत किती आहे.

Gold Silver Price 14 October: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. दिवाळीपूर्वीच आज सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले असून सोनं आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलंय. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०९ रुपये प्रति १० ग्रॅमनं वाढून ७६,१३२ रुपये झाला आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव ५३७ रुपयांनी वधारून ९०,५०० रुपयांवर पोहोचला आहे.

यंदा सोनं १२,७१० रुपयांनी महागलं

यंदा सोनं १२,७८० रुपये प्रति १० ग्रॅमनी महागलं आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३,३५२ रुपये होती. मात्र, या काळात चांदी ७३,३९५ रुपयांवरून ९०,५०० रुपये प्रति किलो झाली आहे. २९ मे २०२४ रोजी चांदीनं ९४,२८६ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.

सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५०७ रुपयांनी वाढून ७५,८२७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६ रुपयांनी वाढून ६९,७३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ३८२ रुपयांनी वधारला असून तो ५७,०९९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. १४ कॅरेट सोन्याचा भाव २९७ रुपयांनी वधारून ४४,५३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७८,४१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये जीएसचे २२८३ रुपये जोडण्यात आलेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७८,१०१ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२७४ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७१,८२९ रुपयांवर पोहोचले आहे. यात जीएसटी म्हणून २०९२ रुपयांची भर पडली.

१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १७१२ रुपयांच्या जीएसटीसह ५८,८११ रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९३,२१५ रुपयांवर पोहोचला आहे.

टॅग्स :सोनंचांदी