Gold Silver Price 9 April: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्यामध्ये पुन्हा तेजी सुरू झाली आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०८ रुपयांनी वधारून ८९,३५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदी ३५३ रुपयांनी घसरून ८०,०१० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत ९२,०३८ रुपये आणि चांदीची किंमत ९२,७१० रुपये होईल.
आयबीजेएनं जारी केलेल्या दरानुसार, २३ कॅरेट सोनं आता ८०५ रुपयांनी महाग झालं असून ते ८९,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या किंमतीवर पोहोचलं आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७४० रुपयांनी वाढून ८१,८५२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ६०६ रुपयांनी वाढून ६७,०१९ रुपये झाला आहे.
क्रेडिट स्कोअर कमी आहे, तरी बँकेचं कर्ज मिळेल का? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्यांदा सायंकाळी ५ च्या सुमारास सोन्याचे दर जाहीर केले जातात.
सोनं ९५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतं
केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया सांगतात की, इतिहासाकडे पाहिलं तर जेव्हा जेव्हा शेअर बाजार एका तिमाहीत २० टक्क्यांपेक्षा जास्त घसरतो तेव्हा सोनं नक्कीच चमकतं. केडिया यांच्या म्हणण्यानुसार, येत्या ३ ते ६ महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३२०० डॉलर आणि भारतात ९४ ते ९५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.
सोन्याचे दर का वाढत आहेत?
सोन्याला आधार देणारे घटक यासाठी कारणीभूत आहेत. जसे भूराजकीय तणाव (युद्ध, तणाव), डी-डॉलरायझेशन, मध्यवर्ती बँका आणि ईटीएफ खरेदी सुरू आहे. शेअर बाजारात घसरण होत आहे. त्याचबरोबर महागाई आणि मंदीचीही भीती आहे. या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.