Lokmat Money >गुंतवणूक > Gold Rate: आज सोनं पुन्हा झालं स्वस्त, पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर

Gold Rate: आज सोनं पुन्हा झालं स्वस्त, पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर

देशातील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 02:11 PM2024-01-05T14:11:35+5:302024-01-05T14:11:49+5:30

देशातील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली.

Gold Rate Gold became cheap again today see what are the new rates check now | Gold Rate: आज सोनं पुन्हा झालं स्वस्त, पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर

Gold Rate: आज सोनं पुन्हा झालं स्वस्त, पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर

Gold Rate 5 January 2024: देशातील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. देशातील बहुतांश ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचे दर ५०० ते ८०० रुपयांनी घसरले आहेत. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचा भाव ६३,००० रुपयांच्या वर आहे. दिल्ली-एनसीआर सोन्याचा दर ६३,४०० रुपये आहे. तर चेन्नईत सोन्याचा दर ६४,९३० रुपये आहे. चांदीचा दर ७८,६०० रुपयांवर आला आहे.

दिल्लीतील आजचा सोन्याचा दर
दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५८,१५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. २४ कॅरेटसाठी ग्राहकांना ६३,४०० रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील.

मुंबईत आजचा सोन्याचा दर
मुंबईत २२ कॅरेट सोन्याची रिटेल किंमत ५८,००० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,२७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

चेन्नईत आजचा सोन्याचा दर
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,६०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर २४ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ६३,९३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

या कारणांवर अवलंबून असतात दर
सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते.

Web Title: Gold Rate Gold became cheap again today see what are the new rates check now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं