Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे

सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे

गेल्या 18 दिवसांत सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 02:31 PM2024-03-11T14:31:54+5:302024-03-11T14:32:06+5:30

गेल्या 18 दिवसांत सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Rate: Historical rise in the price of gold; Today, gold crossed Rs 67,000 per tola | सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे

सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे

Gold Price At Record High: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला आणि भाव 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव 2172 डॉलर प्रति औंस, या ऐतिहासिक उच्चांकावर आहे. त्यामुळेच देशांतर्गत बाजारात पेठेत सोन्याच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.

गेल्या 18 दिवसांत सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2024च्या चौथ्या आठवड्यात सोन्याचा भाव 62,000 रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 5000 रुपयांनी वाढून 67,000 रुपयांवर आला आहे. मुंबईमध्ये सोन्याचा आजचा भाव 67,415 रुपयांच्या वर आहे, तर चेन्नईत 67,000 आणि दिल्लीत 66410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?
अलीकडच्या काळात जगभरातील मध्यवर्ती बँका स्थानिक चलन मजबूत करण्यासाठी सोन्याची खरेदी करत आहेत. मध्यवर्ती बँकांनी केलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे. याशिवाय, यूएस सेंट्रल बँक व्याजदरात कपात करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे डॉलर स्वस्त होईल आणि सोन्याच्या किमती वाढतील. 

सोने 70,000 रुपयांच्या पुढे जाणार
सोन्याची किंमत इथेच थांबणार नाही, तर 2024 मध्ये सोने 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक ओलांडू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Gold Rate: Historical rise in the price of gold; Today, gold crossed Rs 67,000 per tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.