Lokmat Money >गुंतवणूक > Gold Rate : शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम; सोने अन् चांदीचे दर घसरले; जाणून घ्या नवीन भाव...

Gold Rate : शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम; सोने अन् चांदीचे दर घसरले; जाणून घ्या नवीन भाव...

Gold Rate : मागील काही दिवसांत सोने प्रति तोळा 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहे,

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:47 PM2024-08-05T21:47:06+5:302024-08-05T21:47:15+5:30

Gold Rate : मागील काही दिवसांत सोने प्रति तोळा 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहे,

Gold Rate Today: Gold and silver prices fell; Know the new rates | Gold Rate : शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम; सोने अन् चांदीचे दर घसरले; जाणून घ्या नवीन भाव...

Gold Rate : शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम; सोने अन् चांदीचे दर घसरले; जाणून घ्या नवीन भाव...

Gold Rate India: सोमवारी(दि.5) एकीकडे शेअर बाजार कोसळला, तर दुसरीकडे दुसरीकडे सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणावर घसरले. भारताच्या तुलनेत जागतिक सोन्याच्या बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. विशेषतः अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि चीनच्या बाजारपेठेत मोठा भूकंप झाला आहे. सोमवारी संध्याकाळी एमसीएक्स फ्युचर्सवर सोन्याचा भाव 1 टक्क्यांनी घसरून 69,565 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला.

सोन्याच्या दरात मोठी घसरण 
आपण भारताबद्दल बोललो तर, सोमवारी संध्याकाळी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 69117 रुपये होती. तर सोमवारी सकाळी सोन्याचे दर 69,699 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव 70392 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच सोमवारी सकाळच्या तुलनेत संध्याकाळी सोन्याचे दर 582 रुपयांनी कमी झाले, शुक्रवारच्या तुलनेत 1275 रुपयांनी कमी झाले आहेत. विशेष म्हणजे, 18 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा 75,000 रुपयांच्या जवळ पोहोचला होता. तेथून सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहे, हा ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे.

चांदी इतकी स्वस्त झाली 
याशिवाय सोमवारी चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात किलोमागे 4551 रुपयांची घट झाली. सध्या 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर 78950 रुपये आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 83501 रुपये प्रति किलो होता. विशेष म्हणजे सोने स्वस्त झाल्याने यंदाच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या लग्नसराईसाठी दागिने खरेदीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना मोठी संधी मिळाली आहे. गेल्या महिन्यातच अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्यात आली होती. यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली.

सोन्याची तस्करी थांबणार!
सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याची तस्करी थांबू शकते. अलीकडच्या काळात देशात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली होती. करात मोठी कपात केल्याने अवैध आयात संपुष्टात येण्यास मदत होईल, असा उद्योग क्षेत्रातील लोकांचा विश्वास आहे. देशातील सुमारे 15 टक्के सोने तस्करीच्या माध्यमातून बाजारपेठेत पोहोचते, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. मात्र आता हे बंद होणार आहे, कारण आयात शुल्कात कपात केल्यानंतर तस्करीचे सोने खरेदीत कोणताही फायदा होणार नाही.

Web Title: Gold Rate Today: Gold and silver prices fell; Know the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.