Join us

Gold Rates : का स्वस्त झालं सोनं? ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, खरेदी करण्याची हीच का योग्य वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 1:35 PM

काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्यानं घसरण होताना दिसतेय. सोन्यात ५ हजारांची, तर चांदीच्या दरात १० हजारांची घसरण झालीये.

Gold-Silver Price: काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्यानं घसरण होताना दिसतेय. आंतरराष्‍ट्रीय बाजारातील काही घडामोडींचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येतोय. सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 5 हजार रुपयांनी घसरला आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न असेल की सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे की नाही? नवरात्रीपासून सणासुदीला सुरुवात होणार आहे. या काळात सोन्या-चांदीची मागणी वाढते. भारतात दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे.61700 रुपयांवर पोहोचलेलं सोनंआंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः अमेरिकन बाजारातील दबावामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1827.40 डॉलर प्रति औंस झाला. केवळ चार महिन्यांपूर्वी ते 2,085.40 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 0.48 टक्क्यांनी घसरून 21.28 डॉलर प्रति औंस झाला. भारतीय सराफा बाजारातही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरानं 61700 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. त्या पातळीपासून आतापर्यंत सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 5 हजार रुपयांनी घसरलाय.भारतातील सोन्या-चांदीची स्थितीगुरुवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे. सकाळी चांदी 467 रुपयांच्या वाढीसह 67352 रुपयांवर आहे. त्याचप्रमाणे सोन्याचा भाव 149 रुपयांनी वाढला असून तो 56870 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. सराफा बाजाराबाबत बोलायचं झाले तर बुधवारी कामकाज बंद झालं तेव्हा सोन्याचे दर 56653 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 67446 रुपये प्रति किलोवर बंद झाली. सराफा बाजारात चांदीचा भाव चार महिन्यांपूर्वी 77280 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यात चार महिन्यांपूर्वीच्या तुलनेत सुमारे 10 हजार रुपयांची घट झाली आहे.का झाली घसरण?बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर सोन्याची किंमत ठरवली जाते. सोन्याची मागणी वाढल्यानं त्याचे दरही वाढतील. जागतिक आर्थिक परिस्थिती त्याच्या दरांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते. उदाहरणार्थ, जर जागतिक अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असेल तर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. त्यामुळे सोन्याचे दर झपाट्यानं वाढू लागतात. कोरोना महासाथीच्या काळात गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याचे हेच कारण होते. सोने सध्या काही महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. येत्या सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यानं आवक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत यामध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सोनंव्यवसाय