Join us  

Gold Silver Price 12 Aug: सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट गोल्डचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 2:09 PM

Gold Silver Price 12 Aug: जर तुम्ही आज सोन्याचांदीमध्ये गुंतवणूकीच्या विचारात असाल तर यापूर्वी आजचे दर पटापट चेक करुन घ्या.

Gold Silver Price 12 Aug: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित बदल झाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६६ रुपयांनी वाढून ६९७२९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. शुक्रवारी तो ६९६६३ रुपयांवर बंद झाला होता. तर गेल्या आठवड्यात चांदी ८०२६३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, आज त्यात केवळ ७३ रुपयांची वाढ होऊन ती ८०३३६ रुपयांवर आली.

आयबीजेएनुसार २३ कॅरेट सोन्याच्या दरात ६६ रुपयांनी वाढ होऊन तो ६९४५० रुपये प्रति १० ग्रॅम झालe. मात्र, २२ कॅरेट सोन्याच्या दरात केवळ ६१ रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर ६३८७२ रुपयांवर उघडला. तर दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याचा भाव ५० रुपयांनी वाढून ५२२९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव ५८ रुपयांनी कमी होऊन ४६,९६० रुपये झाला आहे. सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएद्वारे जाहीर केले जातात. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नसतो. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.

जीएसटीसह दर किती?

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७१८२० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७१५३३ रुपये झाली आहे. त्यात ३ टक्के जीएसटीमध्ये २०८३ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५७८८ वर पोहोचला आहे. त्यात जीएसटीमध्ये १९१६ रुपयांची भर पडली.

१८ कॅरेट सोन्याची किंमत १५६८ रुपये जीएसटीसह ५३८६५ रुपये आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा होत नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८२७४६ रुपयांवर पोहोचला आहे.

टॅग्स :सोनंचांदी