Join us  

Gold Silver Price 18 Sep: सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतच्या सोन्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 2:27 PM

Gold Silver Price 18 Sep: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट.

Gold Silver Price 18 Sep: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो ३६९ रुपयांची घसरण झाली. तर दुसरीकडे आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २२२ रुपयांनी कमी होऊन ७३५०५ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. 

१४ ते २३ कॅरेट सोन्याचा दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २२२ रुपयांनी कमी होऊन ७२७६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६९९६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आज त्यात २०३ रुपयांची घसरण झाली आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १६६ रुपयांनी कमी झाला असून तो ५४७९१ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १३० रुपयांनी घसरून ४२७३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

कोण जाहीर करतं दर?

सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

जीएसटीसह किती आहे सोन्या-चांदीचे दर

जीएसटीनंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७५२४५ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २१९१ रुपये जीएसटीचे जोडलेले आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७४९४३ रुपये झाली. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २१८२ रुपयांची भर पडली. तर २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर २००७ रुपयांच्या जीएसटीसह आज ते ६८९२५ रुपयांवर पोहोचलं आहे.

१६४३ रुपयांच्या जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५६४३४ रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सच्या नफ्याचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८९७८३ रुपयांवर पोहोचला आहे.

टॅग्स :सोनंचांदी