Join us

Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 3:55 PM

Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात आज बदल झालाय. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात आज बदल झालाय. चांदीच्या दरात प्रति किलो ७६९ रुपयांची वाढ झाली. तर दुसरीकडे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव १० रुपयांनी कमी होऊन ७३,२०२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज चांदीचा भाव ८८२७५ रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५५ रुपयांनी कमी होऊन ७२९०९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६७०५३ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. आज त्यात ५० रुपयांची घसरण झाली आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १२५ रुपयांनी कमी होऊन ५४,७७६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३२ रुपयांनी कमी होऊन ४२८२३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

दर कोण जाहीर करतं?

सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग जार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

जीएसटीसह दर किती?

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७५,३९८ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २१९६ रुपये जीएसटीचा समावेश आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७५०९६ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीप्रमाणे यात २१८७ रुपयांची भर पडलीये. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ६९०६४ रुपयांवर पोहोचलं आहे. यामध्ये २०११ रुपये जीएसटी म्हणून जोडण्यात आलेत.

१८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५६५४९ रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा समाविष्ट नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९०९२३ रुपयांवर पोहोचला आहे.

टॅग्स :सोनंचांदी