Gold Silver Price Today : सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित बदल झाला आहे. सोनं फक्त २ रुपयांनी स्वस्त होऊन उघडलं. तर चांदीही १३० रुपयांनी स्वस्त होऊन उघडली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २ रुपयांनी कमी होऊन ७१७१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा भाव ७१,७१९ रुपयांवर बंद झाला होता. तर, चांदीचा भाव बुधवारच्या ८४९१३ रुपये प्रति किलोच्या तुलनेत आज ८४७८३ रुपये प्रति किलोवर खुला झाला.
२३ कॅरेट सोन्याच्या आयबीजेए दराबद्दल बोलायचं झालं तर आज तो २ रुपयांनी स्वस्त होऊन ७१४३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरातही २ रुपयांनी घसरण झाली आहे. आज तो ६५६९३ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४३७८८ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४१९५४ रुपये झालाय.
विशेष म्हणजे सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.
जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर
जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७४,०४० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७३७४३ रुपये आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटीनुसार २१४७ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज जीएसटीसह त्याचा दर ६७८२१ रुपयांवर पोहोचला आहे. त्यात जीएसटीची १९७५ रुपयांची भर पडली आहे.
१६१७ रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५५५३० रुपये झालाय. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा जोडण्यात आलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८७४३६ रुपयांवर पोहोचला आहे.