Gold Silver Price 24 April: लग्नसराईत सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी थोडा खिशावर आणखी भार पाडणारी बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं 621 रुपये प्रति 10 ग्रॅमनं महागलं आणि 72219 रुपयांवर उघडलं. आज चांदीचा भाव 793 रुपयांनी वाढून 80800 रुपयांवर उघडला.
IBJA च्या नवीनतम दरानुसार, आज म्हणजेच बुधवार, 24 एप्रिल रोजी 23 कॅरेट सोनं 619 रुपयांनी महागलं आणि 71930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 569 रुपयांनी वाढून 66153 रुपयांवर पोहोचला. तर 18 कॅरेट सोन्याचा दरही आज 465 रुपयांनी वाढून 54164 रुपयांवर पोहोचला आहे.
एप्रिलमध्ये तेजीनं वाढ
एकीकडे तापमानाचा पारा चढतोय तर दुसरीकडे सोन्याचा भावही वेगानं वाढत आहे. 1 एप्रिल रोजी सोन्यानं 68964 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रम केला आणि 3 एप्रिल रोजी पुन्हा 69526 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. दुसऱ्याच दिवशी, 4 एप्रिल रोजी, सोन्यानं 69936 चा नवीन सार्वकालिक उच्चांकी स्तर गाठला. चार दिवसांनंतर पुन्हा हा विक्रम मोडला आणि 8 एप्रिलला सोन्याचा भाव 71279 रुपयांवर पोहोचला. दुसऱ्याच दिवशी 9 एप्रिलला सोन्याच्या दरानं 71507 रुपयांचा नवा उच्चांक गाठला.
यानंतर 12 एप्रिलला सोन्याचा दर 73174 रुपये आणि 16 एप्रिलला 73514 रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी, 19 एप्रिल रोजी आणखी एक नवीन विक्रम प्रस्थापित करताना, सोनं 73596 रुपयांचा दर गाठला. सोनं आणि चांदीचे दर IBJA द्वारे जारी केले जातात. यावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचं शुल्क नाही. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या किमतीत 1000 ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो.