Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर

Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर

Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:54 PM2024-10-03T13:54:10+5:302024-10-03T13:54:25+5:30

Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 3 October Big increase in gold and silver price on the first day of Navratri 2024 Check Gold Rates from 14 to 24 karat | Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर

Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर

Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदी आज १०४८ रुपयांनी वधारून ९०९३० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५७६२ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यात आज २४७ रुपयांची वाढ झाली. हे सोन्या-चांदीचे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेटपर्यंतचे रेट

२३ कॅरेट सोन्याचा दर २४६ रुपयांनी महाग होऊन तो ७५४५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २२६ रुपयांची वाढ होऊन तो ६९३९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. १८ कॅरेट सोन्याच्या दरात १८६ रुपयांची तेजी आली आहे. यानंतर याचे दर ५६८२२ रुपयांवर पोहोचलाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आज १४५ रुपयांनी वधारुन ४४३२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलाय.

जीएसटीसह काय आहे दर?

२४ कॅरेट सोन्याचे दर आता जीएसटीसह ७८०३४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेत. यामध्ये २२७२ रुपये जीएसटीचा समावेश आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा दर ७७७२२ रुपये आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटीनुसार २२६३ रुपये जोडण्यात आलेत. जर २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर याचा जीएसटीसह दर ७१४७९ रुपये झालाय. यामध्ये जीएसटीचे २०८१ रुपये जोडण्यात आलेत. 

१८ कॅरेट सोन्याची किंमत आता १७०४ रुपये जीएसटीसह ५८५२६ रुपयांवर पोहोचलीये. यामध्ये ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सच्या नफ्याचा समावेश नाही. एक किलो चांदीचे दर जीएसटीसह ९३६५७ रुपयांवर पोहोचलेत.

Web Title: Gold Silver Price 3 October Big increase in gold and silver price on the first day of Navratri 2024 Check Gold Rates from 14 to 24 karat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.