Gold Silver Price: सोन्यातील गुंतवणूक ही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही, सोन्याचे भाव चढे असूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीचा उत्साह दिसून आला. छोट्या ज्वेलर्सपासून ते मोठ्या ब्रँडेड शोरुम्सनं ग्राहकांनी अनेक स्कीम्स आणि सवलती आणल्या होत्या.
कमॉडिटी एक्सपर्ट अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव ५९,८४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गुरुवारी तो ७१,५०५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे गेल्या वर्षभरात सोन्यानं जवळपास २० टक्के परतावा दिला आहे. केडिया यांच्या मते, सोन्याच्या वाढीमागे काही गोष्टी कारणीभूत आहेत. अशा तऱ्हेनं पुढील अक्षय्य तृतीयेला सोने ८०,००० च्या पुढे दिसू शकतं. सोन्याच्या खरेदीकडे लोकांचा कल कायम आहे. चांगला परतावा मिळाल्यानं गोल्ड कमॉडिटी बेस्ड म्युच्युअल फंडांकडे तरुणांचा कल झपाट्यानं वाढत आहे.
सोन्याच्या दरात तेजी
शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी सोन्या-चांदीचे दर बजेट बाहेर गेल्याचं दिसत आहेत. वायदा बाजारात सोन्याची सुरुवात मोठ्या तेजीसह झाली. चांदीच्या दरानंही मोठी झेप घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय वायदा बाजारातही दिसून आला. सकाळी एमसीएक्सवर सोनं ४५० रुपयांनी वधारून ७२,०९५ च्या आसपास उघडलं. पण त्यानंतर त्यात ५०० रुपयांची वाढ झाली आणि ७२,१४८ च्या आसपास व्यवहार करत होती. चांदीनंही ८५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचे दर ५०१ रुपयांच्या वाढीसह ८५००० रुपये प्रति किलो झाला.