Join us

Gold-Silver Price: आठवड्यात पहिल्यांदा सोने झाले स्वस्त; किंमत वाढण्यापूर्वी खरेदीची संधी, तुमच्या शहरातील दर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:17 IST

Gold Silver Price : गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी थोडा दिलसा मिळाला आहे.

Gold Silver Price : सध्या देशात सणासुदीमुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. असाच उत्साह शेअर बाजारातही पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना चांगलीच लॉटरी लागली. सेन्सेक्स ऐतिहासिक सर्वोच्च पातळीवर गेला होता. अशीच वाढ सोने-चांदीमध्येही पाहायला मिळत होती. देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज या किमतीत थोडा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तुम्ही जर सोने-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आजच दर नक्की चेक करा.

सोमवारी (16 सप्टेंबर) देशात सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. शुद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याचा भाव महत्त्वाच असतो. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 91,900 रुपये प्रतिकिलो आहे. सोने आज 100 रुपये स्वस्त झाले. 

सोन्या-चांदीचे भाव का बदलतात?सोन्या-चांदीच्या किंमतीतील चढ-उतार अनेक कारणांमुळे प्रभावित होतात. सोन्याची जागतिक मागणी, चलनातील चढउतार, व्याजदर आणि सरकारी धोरणे सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. याव्यतिरिक्त, जागतिक आर्थिक परिस्थित आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर्सची ताकद यासारखे आंतरराष्ट्रीय घटक देखील भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात.

आठवडाभरात भावात मोठी वाढगेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली असून, या काळात चांदीच्या दरात 6,400 रुपयांची वाढ झाली आहे.

प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा भाव:

  • बेंगळुरू: 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चेन्नई: 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • दिल्ली: 75,030 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • कोलकाता: 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • मुंबई: 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम

प्रमुख शहरांमध्ये आज चांदीचा भाव: 

  • चेन्नई: 98,000 रुपये प्रति किलो
  • मुंबई : 93,100 रुपये प्रति किलो
  • दिल्ली: 93,000 रुपये प्रति किलो
  • कोलकाता: 93,000 रुपये प्रति किलो
टॅग्स :सोनंगुंतवणूकचांदी