Gold Silver Price 7 May: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या (Gold Silver Price) दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळत आहे. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी येत आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ असल्याचं मानलं जातं. आज मुंबई, अहमदाबाद, जयपूर, आग्रा, बरेली, एटा, चेन्नई, कानपूर, कोलकाता, इंदूर, गोरखपूर, लखनौ, दिल्ली, अहमदाबाद पासून कन्याकुमारीपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात हा बदल झाला आहे.
सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. मंगळवार, 7 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सोमवारच्या 71775 रुपयांच्या बंद किंमतीच्या तुलनेत 41 रुपयांनी स्वस्त झाला. सोन्याचा भाव आता प्रति 10 ग्रॅम 71775 रुपयांवर आला आहे. तर चांदी 208 रुपयांनी वधारून 81,500 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
19 एप्रिल 2024 रोजी सोनं 73596 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होतं. त्यानुसार आज प्रति 10 ग्रॅम सोनं 1702 रुपयांनी स्वस्त झालंय. मात्र, चांदी 16 एप्रिल रोजी 83632 रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवरून 1827 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आयबीजेएने आज जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, 7 मे रोजी 23 कॅरेट सोन्याचा भाव 40 रुपयांनी घसरून 71334 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. या सोन्याची शुद्धता 95 टक्के आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 100 रुपयांनी कमी होऊन 66,260 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भावही 24 रुपयांनी कमी होऊन 53716 रुपये झाला आहे. तर 14 कॅरेट सोन्याच्या दरात 24 रुपयांनी घट झाली आहे आणि आता याचा दर 41988 रुपयांवर आलाय.
जागतिक स्तरावर तेजी
आज, मंगळवारी जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात ही वाढ होत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा जागतिक वायदा भाव 0.06 टक्के म्हणजेच 1.40 डॉलरच्या वाढीसह 2,332.60 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता. तर सोन्याचा जागतिक स्पॉट भाव सध्या 2,324.52 डॉलर प्रति औंस आहे.