Gold Silver Price Rate Today : सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७४,६७१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा भाव मात्र ३१२ रुपयांनी वधारून ८८०६८ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.
१४ ते २४ कॅरेटपर्यंतचे दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २०३ रुपयांनी वाढून ७४३७२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १८७ रुपयांनी वाढून ६८३९९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १५३ रुपयांनी वाढला असून तो ५६००३ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १२० रुपयांनी वाढून ४३६८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर
जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७६९११ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २२४० रुपये जीएसटीचा समावेश आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७६६०३ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२३१ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७०४५० रुपयांवर पोहोचलं आहे. यात जीएसटी म्हणून २०५१ रुपयांची भर पडली आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १६८० रुपयांच्या जीएसटीसह ५७६८३ रुपये झाला आहे. यामध्ये ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सच्या नफ्याचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९०७१० रुपयांवर पोहोचलाय.