Join us

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 3:32 PM

Gold Silver Price Today : खरेदीपूर्वी जाणून घ्या, पाहा काय आहेत १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर.

Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. दिवाळीपूर्वीच आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६२ रुपयांनी वाढून ७५६०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव १५६४ रुपयांनी वाढून ८९९१७ रुपये प्रति किलो झाला आहे.

सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोने-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७५९ रुपयांनी वाढून ७५२९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ६९८ रुपयांनी वाढून ६९२५० रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ५७१ रुपयांनी घसरला असून तो ५६७०० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ४४५ रुपयांनी वाढून ४३७८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बाँड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

टॅग्स :सोनंचांदी