Lokmat Money >गुंतवणूक > Gold-Silver Price Today: सोनं झालं स्वस्त, चांदीचा दरही झाला कमी; पाहा काय आहे २२ कॅरेट Gold रेट

Gold-Silver Price Today: सोनं झालं स्वस्त, चांदीचा दरही झाला कमी; पाहा काय आहे २२ कॅरेट Gold रेट

आज 22 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 02:15 PM2024-04-22T14:15:55+5:302024-04-22T14:18:02+5:30

आज 22 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

Gold Silver Price Today Gold became cheaper silver price also reduced See what is 22 carat gold rate | Gold-Silver Price Today: सोनं झालं स्वस्त, चांदीचा दरही झाला कमी; पाहा काय आहे २२ कॅरेट Gold रेट

Gold-Silver Price Today: सोनं झालं स्वस्त, चांदीचा दरही झाला कमी; पाहा काय आहे २२ कॅरेट Gold रेट

आज 22 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलो आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73161 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 81939 रुपये झालीये.
 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (India Bullion And Jewellers Association) , शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 73404 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 73161 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.
 

आज किती आहे किंमत?
 

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 72868 रुपयांपर्यंत घसरली आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 67016 रुपये झाली. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 54871 रुपयांवर आला. त्याच वेळी, 585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 42799 रुपयांनी स्वस्त झालं आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज 81939 रुपये झालीये.
 

मिस कॉलद्वारे किंमत जाणून घ्या
 

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी दर जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. यानंतर काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला दराबाबत माहिती उपलब्ध होईल. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता. यातील सर्व किंमती या जीएसटी आणि मेकिंग चार्जेजशिवाय आहेत.  IBJA नं जारी केलेले दर देशभरात लागू असतात, पण त्यात जीएसटीचा समावेश नसतो.

Web Title: Gold Silver Price Today Gold became cheaper silver price also reduced See what is 22 carat gold rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.