Join us

सोन्याच्या किंमतीला झळाळी, पण चांदी फिकी पडली; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 7:09 PM

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असताना तुम्हाला स्वस्त सोने खरेदीची चांगली संधी आहे.

Gold Silver Price Today: आज(दि.20) सोन्याच्या (Gold Silver Price Today) किमतीत तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स एक्सचेंजवर मंगळवारी सकाळी 4 ऑगस्ट 2023 रोजी डिलिव्हरीसाठीचे सोने 0.14 टक्के किंवा 83 रुपयांनी वाढून 59,171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करताना दिसले. तर, 5 ऑक्टोबर 2023 रोजी डिलिव्हरीसाठीचे सोने 0.10 टक्के किंवा 59 रुपयांनी वाढून 59,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतर चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. 

चांदीची किंमत घसरली...एकीकडे सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळत होती, तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत(Silver Price Today) घट झाली. एमसीएक्सवर 5 जुलै 2023 रोजी डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 0.01 टक्के किंवा 10 रुपयांनी घसरुन 72,436 रुपये प्रति किलोग्रामवर आला.

स्वस्त सोने खरेदीची संधीसोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असताना तुम्हाला स्वस्त सोने खरेदीची संधी आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीमची 2023-24 वर्षाची पहिली सीरीज 19 जूनपासून सुरू झाली आहे. यात 23 जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन, दोन्ही पद्धतीने यात गुंतवणूक करता येईल. ऑनलाइन गुंतवणूक केल्यावर 50 रुपये सूट मिळेल. सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या गुंतवणूकीवर 2.50 टक्के वार्षिक व्याज मिळते.

बॉण्डवर तुम्ही कर्जदेखील घेऊ शकता. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड म्हणजेच IBJA च्या पब्लिश्ड रेटच्या आधारावर बॉण्डची किंमत ठरते. RBI नुसार, गोल्ड बॉण्डची दुसरी सीरीज 11 ते 15 सप्टेंबर 2023 ला सुरू होईल आणि इश्यू डेट 20 सप्टेंबर असेल.

सोन्याच्या विक्रीसाठी नियम कडक झाले

सरकारने 1 एप्रिल 2023 पासून सोने खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार सोने खरेदी-विक्रीसाठी नवीन नियम पाळणे आवश्यक आहे. जर एखाद्या ज्वेलर्सने असे केले नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याला दंड भरावा लागू शकतो. सोने खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) क्रमांक 1 एप्रिलपासून सर्व सोन्याच्या दागिन्यांवर अनिवार्य आहे.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसायगुंतवणूक