Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Rate Today: मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत वाढ; चांदी घसरली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today: मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत वाढ; चांदी घसरली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today: गेल्या ३ दिवसात सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांपेक्षा जास्त तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:36 AM2024-07-26T10:36:57+5:302024-07-26T10:37:41+5:30

Gold Silver Rate Today: गेल्या ३ दिवसात सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांपेक्षा जास्त तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Gold prices rise today after big fall Silver falls check the latest rate before buying | Gold Silver Rate Today: मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत वाढ; चांदी घसरली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today: मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत वाढ; चांदी घसरली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Rate: शुक्रवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. याआधी गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. गेल्या ३ दिवसात सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांपेक्षा जास्त तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात अचानक अशी घसरण होण्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारने २३ जुलै रोजी कस्टम ड्युटीमध्ये केलेली कपात असल्याचं मानलं जात आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे सोन्या-चांदीचे आजचे दर.

सोन्याच्या दरात किरकोळ वाढ

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्सवर ट्रेडिंगच्या अखेरच्या दिवशी २६ जुलै रोजी ५ ऑगस्ट फ्युचर्स डिलिव्हरीसाठी सोनं ६७७५० रुपयांवर ट्रेड करत होतं, तर ४ ऑक्टोबर रोजीच्या फ्युचर डिलिव्हरीसाठी सोनं ३५९ रुपयांनी वधारल्यानंतर ६८२३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होतं. याशिवाय ५ डिसेंबरला फ्युचर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ४११ रुपयांनी वधारून ६८८०० रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यवहार करत होता.
याआधी गुरुवारी व्यवहाराच्या अखेरच्या सत्रात ५ ऑगस्ट रोजी फ्युचर डिलिव्हरीसाठी सोनं ६७४६२ रुपये प्रति १० ग्रॅम, तर ४ ऑक्टोबर रोजी गोल्ड फ्युचर्स डिलिव्हरी ६७८७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली. याशिवाय ५ डिसेंबर रोजी फ्युचर डिलिव्हरीसाठी सोनं ६८३८९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले.

चांदीत घसरण सुरूच

तर चांदीच्या दरात शुक्रवारी ७५० रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर ५ सप्टेंबरच्या फ्युचर डिलिव्हरीसाठी चांदी ८१२३९ रुपये प्रति किलो, तर ५ डिसेंबरच्या फ्युचर डिलिव्हरीसाठी चांदी ८३४५२ रुपये प्रति किलो आहे. याशिवाय ५ मार्च २०२५ रोजी फ्युचर डिलिव्हरीसाठी चांदी सुमारे ५०० रुपयांनी वाढून ८६४७५ रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत होती.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण का झाली?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली, त्यामुळे या दोन्हींच्या किमतीत घसरण झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी ९ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणल्यानंतर भारतीय सराफा बाजारात याचा परिणाम दिसून आला.

Web Title: Gold Silver Rate Gold prices rise today after big fall Silver falls check the latest rate before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.