Join us  

सोनं सोडा...चांदीत गुंतवणूक करा; पाच दिवसांत दिला बंपर परतावा, पाहा नवीन दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:34 PM

चांदीने सोन्यालाही मागे टाकले आहे.

Gold-Silver Rate: देशात एकीकडे सोन्याचे भाव (Gold Rates) गगनाला भिडत आहेत, तर चांदीच्या दरातही (Silver Rate) सातत्याने वाढ होत आहे. आपण गेल्या पाच दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास, सोन्यापेक्षा चांदीमधीलगुंतवणूक अधिक फायदेशीर ठरत आहे. चांदीच्या दरात किलोमागे 3000 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याऐवजी चांदीमध्ये गुंतवणूक  (Silver Investment) करणाऱ्यांना जास्त परतावा मिळतोय.

पाच दिवसात चांदी इतकी वाढलीइराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या काळात सोन्याच्या किमतीसोबतच चांदीच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी(सोमवारी) त्यात काहीशी घसरण झाली. पण, गेल्या पाच व्यवहार दिवसांत चांदीने भाव वाढीच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकले आहे. 30 सप्टेंबर रोजी देशांतर्गत बाजारात एक किलो चांदीची किंमत 89,400 रुपये होती, जी पाच दिवसांत वाढून 92,200 रुपये प्रति किलो झाली. त्यानुसार पाहिल्यास चांदीच्या दरात किलोमागे 2800 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत किरकोळ वाढीसह 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे.

एमसीएक्सवर चांदीचा नवीन दर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंज, म्हणजेच MCX वर चांदीच्या किमती पाहिल्यास, सोमवारी त्या 586 रुपये प्रति किलो घसरून 92,763 रुपयांवर व्यवहार करत होत्या. 30 सप्टेंबर रोजी चांदी 90,719 रुपये प्रति किलोवर होती. त्यानुसार त्याची किंमत सुमारे 2000 रुपयांनी वाढली आहे. आपण MCX गोल्ड रेटबद्दल बोललो, तर 30 सप्टेंबरला हा 75611 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि आता हा 629 रुपयांनी वाढला आहे.

एका महिन्यात चांदीने एवढा नफा दिलागेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, चांदीने गुंतवणूकदारांना प्रति किलो इतका मोठा नफा कमावला आहे. MCX वर त्याची किंमत 6 सप्टेंबर रोजी 82,757 रुपये प्रति किलो होती, जी आता 92763 रुपयांवर पोहोचली आहे. त्यानुसार पाहिल्यास गुंतवणूकदारांना प्रति किलो 10,006 रुपये नफा झाला आहे. सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, एका महिन्यात 71,944 रुपयांवरून 76,240 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच प्रत्येक 10 ग्रॅमवर ​​गुंतवणूकदारांना 4296 रुपयांचा नफा झाला आहे.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :गुंतवणूकसोनंचांदीव्यवसाय