Lokmat Money >गुंतवणूक > घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा

घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा

Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरानं आज उच्चांकी पातळी गाठली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:20 PM2024-10-16T15:20:25+5:302024-10-16T15:20:25+5:30

Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरानं आज उच्चांकी पातळी गाठली.

Gold silver rate today bounce back after slump silver gains over Rs 1400 Check new rates | घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा

घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा

Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरानं आज उच्चांकी पातळी गाठली. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५७२ रुपयांनी वाढून ७६,५०२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याआधी सोमवारी तो ७६,१३२ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. जीएसटीमुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये २२९५ रुपये जीएसटीचा समावेश आहे. सराफा बाजारात चांदीच्या दरात किलोमागे १४५४ रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदी ९१,२५४ रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली.

सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. आपल्या शहरातील सोन्या चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५७० रुपयांनी वाढून ७६,१९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७८,४८१ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २२८५ रुपयांची भर पडली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५२४ रुपयांनी वाढून ७०,076 रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज जीएसटीमुळे तो ७२१७८ रुपयांवर पोहोचला. यात २१०२ रुपये जीएसटीचा समावेश आहे.

तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ४२९ रुपयांनी वधारला असून तो ५७,३७७ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत आता १७२१ रुपये जीएसटीसह ५९,०९८ रुपये झाली आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही.

तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३३५ रुपयांनी वधारून ४४,७५४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. १३४२ रुपयांच्या जीएसटीसह तो ४६,०९६ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९३९९१ रुपयांवर पोहोचला.

Web Title: Gold silver rate today bounce back after slump silver gains over Rs 1400 Check new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.