Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price 27 Sep: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहे आजचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:00 PM2024-09-27T15:00:17+5:302024-09-27T15:01:19+5:30

Gold Silver Price 27 Sep: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहे आजचे नवे दर.

Gold Silver Rates Gold fell from record high silver also became cheaper by Rs 1764 See the latest rates of gold and silver | Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price 27 Sep: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीही गुरुवारी ९२,५२२ रुपयांवरून १७६४ रुपयांनी घसरून ९०७५८ रुपये प्रति किलोग्रॅम झाली. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५६८१ रुपयांवर आला आहे. अवघ्या ८ दिवसात सोनं २६२७ रुपयांनी महागलं. मात्र, या काळात चांदीच्या दरात ३५९० रुपयांची वाढ झाली आहे. 

गुरुवारी सोन्यानं ७५७५० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला. चांदीचा भाव मात्र ९२५२२ रुपये प्रति किलो होता. सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस यांचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची दाट शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ६९ रुपयांनी कमी होऊन ७५३७८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६३ रुपयांनी कमी होऊन ६९३२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १८ रुपयांनी कमी होऊन ५६,७६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ४१ रुपयांनी घसरून ४४२७३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७७,९५१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये जीएसटीचे २२७० रुपये जोडले गेले आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७७,६३९ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २२६१ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७१,४०३ रुपयांवर पोहोचलंय. यात जीएसटी म्हणून २०७९ रुपयांची भर पडलीये.

१८ कॅरेट सोन्याची किंमत आता १७०२ रुपये जीएसटीसह ५८,४६३ रुपये झाली आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९५,२९७ रुपयांवर पोहोचला आहे.

Web Title: Gold Silver Rates Gold fell from record high silver also became cheaper by Rs 1764 See the latest rates of gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.