Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Rates Today: स्वस्त झाले सोन्याचे दर! विक्रमी उच्चांकाहून ₹४५०० नं घसरलं, पुढे काय अंदाज?

Gold Silver Rates Today: स्वस्त झाले सोन्याचे दर! विक्रमी उच्चांकाहून ₹४५०० नं घसरलं, पुढे काय अंदाज?

Gold Silver Rates Today : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज २३ एप्रिल रोजी दोन्हीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:07 PM2024-04-23T13:07:52+5:302024-04-23T13:08:15+5:30

Gold Silver Rates Today : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज २३ एप्रिल रोजी दोन्हीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

Gold Silver Rates Today become cheaper Dropped by rs 4500 from record high what next know details | Gold Silver Rates Today: स्वस्त झाले सोन्याचे दर! विक्रमी उच्चांकाहून ₹४५०० नं घसरलं, पुढे काय अंदाज?

Gold Silver Rates Today: स्वस्त झाले सोन्याचे दर! विक्रमी उच्चांकाहून ₹४५०० नं घसरलं, पुढे काय अंदाज?

Gold Silver Rates Today :  सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज २३ एप्रिल रोजी दोन्हीच्या किमतीत मोठी घसरण झाली. भारतीय आणि जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून ४५०० रुपयांपर्यंत घसरला आहे. तर चांदीचा भावही ७००० रुपयांपर्यंत घसरला.

स्वस्त झाले दर
 

आज देशांतर्गत वायदा बाजारात सोन्या-चांदीचे भाव ७००-८०० रुपयांनी घसरून उघडले. एमसीएक्सवर, सोनं ६५७ रुपयांनी घसरलं आणि ७०५४० रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ व्यवहार करत होतं. चांदीचा भावही सुमारे ७०० रुपयांनी घसरून ७९८५८ रुपये प्रतिकिलो झाला आहे. सोनं विक्रमी पातळीपासून सुमारे साडेचार हजार रुपयांनी घसरलंय. याच महिन्यात सोन्यानं ७३,९५८ रुपयांचा आजवरचा उच्चांकी स्तर गाठला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही ८६,१२६ रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवरून ७००० रुपयांवर घसरला आहे. 
 

का होतेय घसरण?
 

सराफा बाजारासाठी मोठा ट्रिगर म्हणजे भू-राजकीय तणाव आहे, जो कमी होताना दिसतोय. सुरक्षित गुंतवणुकीची खरेदी बंद झाल्याचाही दबाव आहे. डॉलर इंडेक्स आणि यूएस ट्रेझरी यील्डमधील मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीवरही परिणाम होतो. अमेरिकेत व्याजदर कमी करण्यास विलंब झाल्याचा दुहेरी परिणाम होत आहे. याशिवाय सलग ४ आठवड्यांच्या वाढीनंतर सोन्यात प्रॉफिट बुकींग होतानाही दिसत आहे.
 

ब्रोकरेजचं मत काय?
 

Emirates NBD च्या माहितीनुसार सोनं आणि चांदी सध्याच्या पातळीपेक्षा २ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म निर्मल बंग यांनी सोन्याला प्रति १० ग्रॅम ६९,००० रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. चांदीसाठी ७७,००० रुपये प्रतिकिलोचं टार्गेट ठेवण्यात आलंय. त्याच वेळी, मोतीलाल ओसवाल यांनी COMEX वर सोन्याचं टार्गेट २२४० डॉलर्स प्रति औस दिलं आहे. तर चांदासाठी २६.४० डॉलर्स प्रति औसचं टार्गेट देण्यात आलंय.

Web Title: Gold Silver Rates Today become cheaper Dropped by rs 4500 from record high what next know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.