Lokmat Money >गुंतवणूक > FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरमध्ये १० बँकांनी वाढवला इंटरेस्ट, अजून वाढण्याची शक्यता

FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरमध्ये १० बँकांनी वाढवला इंटरेस्ट, अजून वाढण्याची शक्यता

सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढत असल्यानं बँका त्यांच्या डिपॉझिट्सच्या दरांचा आढावा घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:50 AM2023-10-18T09:50:06+5:302023-10-18T09:51:53+5:30

सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढत असल्यानं बँका त्यांच्या डिपॉझिट्सच्या दरांचा आढावा घेतात.

Good news for FD investors 10 banks increased interest in October likely to increase further icici idfc bank of maharashtra | FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरमध्ये १० बँकांनी वाढवला इंटरेस्ट, अजून वाढण्याची शक्यता

FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरमध्ये १० बँकांनी वाढवला इंटरेस्ट, अजून वाढण्याची शक्यता

मंगळवारी, ICICI बँकेनं फिक्स्ड डिपॉझिटवरील (FD) व्याजदरात बदल केले. ऑक्टोबर महिन्यात एफडीवरील व्याज दरात बदल करणारी ती दहावी बँक ठरली आहे. सणासुदीच्या काळात रिटेल लोनची मागणी पाहता, मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देण्याचा बँकांचा हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर महागाईकडे पाहता रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेनुसार यात वाढ होण्याची शक्यता आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-ऑगस्ट २०२३ मध्ये बँक क्रेडिट ९.१ टक्क्यांनी वाढून १२४.५ लाख कोटी रुपये झालं. तर या कालावधीत बँक डिपॉझिट केवळ ६.६ टक्क्यांनी वाढून १४९.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या. त्यामुळे बँका एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचे अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांच्या मते, सणासुदीच्या काळात क्रेडिट डिमांड कायम राहील. इथे लोकांची बचत कमी झाली आहे आणि हे पाहता ठेवींच्या व्याजदराचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढत असल्यानं बँका त्यांच्या डिपॉझिट्सच्या दरांचा आढावा घेतात.

'या' बँकांनी वाढवलं व्याज
ICICI बँकेनं २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. १५ महिने ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी बँक सर्वसामान्यांना ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के परतावा देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रनं फिक्स्ड डिपॉझिट योजनांवरील व्याजदरात १.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना वार्षिक ४.५ टक्के ते ९ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. याशिवाय अॅक्सिस बँक, कॅनरा बँक, आयडीएफसी बँक, इंडसबँक बँक, बँक ऑफ इंडिया आणि कर्नाटक बँकेनंही २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत.

Web Title: Good news for FD investors 10 banks increased interest in October likely to increase further icici idfc bank of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.