Join us

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीची डेडलाईन वाढली; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 1:06 PM

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या स्कीममध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ७.६० टक्के व्याज दिलं जात आहे. 

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अमृत कलश एफडीमधील गुंतवणुकीची अंतिम मुदत वाढवली आहे. आता किरकोळ गुंतवणूकदार या विशेष एफडीमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकतात. बँकेची ही सर्वाधिक व्याज देणारी एफडी स्कीम आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ७.६० टक्के व्याज दिलं जात आहे.  

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या ४०० दिवसांच्या एफडीवर ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिलं जातंय. या योजनेतील गुंतवणुकीची मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

प्रीमॅच्योर विड्रॉल  

एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीमध्ये या एफडीमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र, यासाठी ०.५ टक्के ते १ टक्के दंड भरावा लागणार आहे. या एफडीमध्ये मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आणि मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. 

एसबीआय एफडीचं व्याज 

  • ७ दिवस ते ४५ दिवस - ३.५ टक्के
  • ४६ दिवस ते १७९ दिवस – ४.७५ टक्के
  • १८० दिवस ते २१० दिवस - ५.७५ टक्के
  • २११ दिवसांपासून ते १ वर्षापेक्षा कमी - ६ टक्के
  • १ वर्षापासून २ वर्षांपेक्षा कमी - ६.८ टक्के
  • ४०० दिवसांची एफडी – ७.१ टक्के
  • २ वर्षापासून ३ वर्षांपेक्षा कमी - ७ टक्के
  • ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी - ६.७५ टक्के
  • ५ वर्षे ते १० वर्षे - ६.५ टक्के 

बँक आपल्या सर्व एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज देत आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूकपैसा