Lokmat Money >गुंतवणूक > सुकन्या समृद्धी, PPF सारख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहेत नवे व्याजदर

सुकन्या समृद्धी, PPF सारख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहेत नवे व्याजदर

सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 08:30 AM2023-10-01T08:30:24+5:302023-10-01T08:31:22+5:30

सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले आहेत.

government big decision on small savings schemes like Sukanya Samriddhi yojana PPF see what are the new interest rates | सुकन्या समृद्धी, PPF सारख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहेत नवे व्याजदर

सुकन्या समृद्धी, PPF सारख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहेत नवे व्याजदर

सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर (Small savings scheme interest rate) जाहीर केले आहेत. यावेळी एक वगळता कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केवळ ५ वर्षांच्या आरडीवरील व्याजदर ६.५ टक्क्यांवरून ६.७ टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), पीपीएफ, किसान विकास पत्र (KVP) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) यांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नसून जुनेच व्याजदर लागू होणार आहेत.

सुकन्या समृद्धीमध्ये ८ टक्के व्याज
अर्ख मंत्रालयाने नुकतेच १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. यानुसार बचत खात्यावर ४ टक्के व्याजदर कायम राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मंथली इन्कम अकाऊंट स्कीमवर ७.४ टक्के, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७ टक्के, पीपीएफवर ७.१ टक्के आणि किसान विकास पत्रावर ७.५ टक्के व्याजदर मिळेल. दुसरीकडे, सुकन्या समृद्धी योजनेवरही पूर्वीप्रमाणेच ८ टक्के व्याज मिळत राहिल.

५ वर्षांच्या आरडीवर व्याज वाढलं
टाईम डिपॉझिटबद्दल बोलायचं झाल्यास, १ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ६.९ टक्के, २ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७ टक्के, ३ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७ टक्के आणि ५ वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर ७.५ टक्के व्याज असेल. सरकारनं पुढील तिमाहीसाठी ५ वर्षांच्या आरडीवरील व्याजदर ६.५ टक्क्यांवरून ६.७ टक्के केला आहे.

Web Title: government big decision on small savings schemes like Sukanya Samriddhi yojana PPF see what are the new interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.