Lokmat Money >गुंतवणूक > सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या नियमात बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 03:40 PM2023-11-21T15:40:30+5:302023-11-21T15:40:53+5:30

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या नियमात बदल केला आहे.

Government changes rules for early withdrawal from Senior Citizen Savings Scheme Know details changes | सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या नियमात बदल केला आहे. हे नवीन नियम ७ नोव्हेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या (SCSS) नियमांमध्ये बदल करण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुम्हालाही सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून वेळेपूर्वी तुमचे पैसे काढायचे असतील तर हे नियम जाणून घेणं आवश्यक आहे.

नवीन नियमांनुसार, एक वर्षाचा गुंतवणुकीचा कालावधी संपण्यापूर्वी खातं बंद केल्यास, जमा केलेल्या रकमेपैकी एक टक्का रक्कम काढून घेतली जाईल. यापूर्वी, एक वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी खातं बंद केल्यास, त्या रकमेवर दिलेलं व्याज वसूल केलं जात होतं आणि खातेदाराला शिल्लक रक्कम दिली जात होती.

जेव्हा एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे किंवा पाच वर्षांसाठी रक्कम ठेवली जाते परंतु ६ महिन्यांनंतर मुदतीपूर्वी पैसे काढले जातात, परंतु ठेवीच्या तारखेपासून एक वर्ष संपण्यापूर्वी, त्या खात्यावरील व्याज दिले जाईल. यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराच्या आधारे जितके महिने पैसे जमा आहेत, तितकं व्याज दिलं जाईल. 

या नियमांतही बदल
सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत या योजनेअंतर्गत खातं उघडू शकते, तर आधी ही मुदत एका महिन्याची होती. अधिसूचनेनुसार, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमअंतर्गत उघडलेल्या खात्यांवरील व्याज लागू योजनेच्या दराच्या आधारावर मोजलं जाईल.

सरकारने अलीकडेच विविध अल्पबचत योजनेचे नियम शिथिल केले आहेत. ज्या योजनांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, त्यात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम इत्यादींचा समावेश आहे. अल्पबचत योजनेतील बदलांशी संबंधित निर्णय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून घेतले जातात. सध्या, सरकार ९ प्रकारच्या अल्प बचत योजना चालवते, ज्यात रिकरिंग डिपॉझिट (RD), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश आहे.

Web Title: Government changes rules for early withdrawal from Senior Citizen Savings Scheme Know details changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.