Join us

पैसे दुप्पट करणारी पोस्टाची 'ही' स्कीम आहे जबरदस्त, ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:42 AM

पोस्ट ऑफिसमध्ये एका पेक्षा एक अनेक उत्तमोत्तम स्कीम्स आहेत. तुम्ही अगदी कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये एका पेक्षा एक अनेक उत्तमोत्तम स्कीम्स आहेत. तुम्ही अगदी कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. अशीच एक खास योजना आहे ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. आम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्राबद्दल तुम्हाला सांगत आहोत. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. भारत सरकारची ही अल्पबचत योजना असल्यानं ती अतिशय सुरक्षितही मानली जाते. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर ७.५ टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे.   

कोण उघडू शकतं अकाऊंट? 

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रौढ व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खातं उघडू शकतो. तुम्हाला हवं असल्यास, जास्तीत जास्त तीन लोक संयुक्त खातं उघडू शकतात. इतकंच नाही तर अल्पवयीन किंवा १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन मुलांच्या वतीनं पालक त्यांच्या स्वत:च्या नावानं पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र खातं उघडू शकतात. 

१००० रुपयांपासून सुरुवात 

किसान विकास पत्र योजनेत किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. तुम्ही १०० च्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकता. यामध्ये कमाल मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. वित्त मंत्रालयाने वेळोवेळी विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत ठेवी मॅच्युअर होतील. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम ११५ महिन्यांत (९ वर्षे आणि ७ महिने) दुप्पट होते. 

मॅच्युरिटीपूर्वी क्लोज करता येणार 

पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, किसान विकास पत्र खातं काही विशिष्ट परिस्थितीतच मॅच्युरिटीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं. सिंगल खातं किंवा संयुक्त खातं कोणत्याही एका किंवा सर्व खातेधारकांच्या मृत्यूनंतर बंद केलं जाऊ शकते. याशिवाय अन्य काही कारणांमुळे हे खातं बंद करता येतं. हे खाते ठेवीच्या तारखेपासून २ वर्षे आणि ६ महिन्यांनंतर बंद केलं जाऊ शकतं.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक