लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अडीअडचणीच्या काळासाठीची तजवीज किंवा सणासुदीदरम्यान भारतीयांमध्ये साेने खरेदीची परंपरा आहे. मात्र, या गुंतवणुकीतून हाेणाऱ्या लाभावर सरकारचा डाेळा आहे. साेने व इतर काही मालमत्तेतील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स लावण्याच्या विचारात सरकार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून कॅपिटल गेन टॅक्सच्या दरांबाबत लवकरच निर्णय हाेण्याची शक्यता आहे. काही मालमत्तांचे सरकार पुनर्वर्गीकरण करणार आहे.
बदल कधीपासून?
येणाऱ्या अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्सच्या रचनेत सरकार बदल करु शकते. महसूलवाढ तसेच विविध याेजनांवरील खर्च वाढविण्यासाठी हा बदल केला जाऊ शकताे.