Join us

Govt Scheme: 'या' सरकारी स्कीममध्ये SIP प्रमाणे करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील ४१ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 7:04 PM

विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना करणाऱ्यांसाठी पीपीएफ हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. यासाठी 15 वर्षांचा मॅच्युरिटी पिरिअड आहे.

Post Office Small Savings Scheme: स्मॉल सेव्हिंग स्कीम्स एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय देतात जिथे तुमचे पैसे गमावण्याची भीती नसते. उलट त्यांना खात्रीशीर परतावाही मिळतो. यामध्ये एक पर्याय देखील आहे, जिथे तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP प्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक करू शकता. या योजनेचे नाव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आहे, जी कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत सुरू केली जाऊ शकते. यामध्ये इतर अनेक लहान बचतींपेक्षा व्याजदरही अधिक मिळत आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण करू शकता.

या योजनेत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. त्याच वेळी, किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मासिक आधारावर कमाल मर्यादा पूर्ण करायची असेल, तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये गुंतवावे लागतील.

किती मिळतेय व्याज?

विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना करणाऱ्यांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीमुळे ते दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. त्याचबरोबर या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास हमखास परतावा मिळतो. सध्या यावर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे.

मॅच्युरिटीवर किती मिळेल रक्कम

  • दरमहा गुंतवणूक: 12500 रुपये
  • व्याज दर: 7.1 टक्के प्रतिवर्ष
  • मॅच्युरिटी: 15 वर्षे
  • मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम: 40,68,209 रुपये
  • एकूण गुंतवणूक: 22,50,000 रुपये
  • व्याज लाभ: 18,18,209 रुपये 

PPF योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहे. एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पीपीएफ ठेवींवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे.

टॅग्स :गुंतवणूकपीपीएफपैसा