Join us  

Income Tax वाचवण्याची मोठी संधी; 31 मार्चपर्यंत घ्या सरकारी योजनांचा लाभ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 2:37 PM

प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही भाग टॅक्स स्वरुपात द्यावा लागतो, पण यातही तुम्ही लाभ घेऊ शकता.

Income Tax Latest News: तुम्ही नोकरी करणारे असाल आणि अद्याप टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट (Tax Investment) केली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही 31 मार्चपूर्वी हे काम नक्की करुन घ्या. हे त्या लोकांसाठी महत्वाचे आहे, ज्यांची कमाई जास्त आहे. कमाई वाढल्यानंतर तुम्हाला टॅक्स भरणे गरजेचे असते. तुम्ही आतापर्यंत टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट केली नसेल, तर तात्काळ करा आणि योजनांमधून करात मोठी सूट मिळवा.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम(ELSS)म्यूचुअल फंडच्या या योजनेत मोठे टॅक्स बेनिफिट मिळते. यात तुम्ही 100 रुपयांची गुंतवणूकही करू शकता आणि 10 ते 12 रिटर्न मिळवू शकता. यात 1.5 लाख रुपयांची टॅक्स सूट मिळते. यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF)पब्लिक प्रोव्हिडेंट फंडमध्ये जास्त गुंतवणूक करुन करात मोठी बचत करू शकता. ही टॅक्स सूटमधील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेत तुम्हाला मोठा कर लाभ मिळतो. तुम्ही या योजनेत 1.5 लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.

प्रोव्हिडेंट फंड (PF)जे लोक निवृत्तीनंतर चांगली कमाई करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम टॅक्स सेव्हिंग योजना आहे. या योजनेत मोठे टॅक्स बेनिफीट मिळतात.

नॅशनल पेंशन स्कीम (NPS)ही एक उत्तम टॅक्स सेव्हिंग योजना आहे, ज्यात तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतची पेंशन मिळू शकते. यात मोठा टॅक्स लाभ मिळतो.

जीवन विमा पॉलिसी (LIC)तुम्ही जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुनही मोठा लाभ मिळू शकतो. यात तुमची 1.5 लाखांपर्यंतची बचत होऊ शकते.

टॅग्स :गुंतवणूकनिवृत्ती वेतनव्यवसाय