Lokmat Money >गुंतवणूक > HDFC ची नवीन योजना, 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक; 28 सप्टेंबरपर्यंत संधी

HDFC ची नवीन योजना, 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक; 28 सप्टेंबरपर्यंत संधी

Mutual Fund NFO: या योजनेत एसआयपीची सुविधादेखील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 05:24 PM2023-09-14T17:24:40+5:302023-09-14T17:25:33+5:30

Mutual Fund NFO: या योजनेत एसआयपीची सुविधादेखील आहे.

HDFC MFs New Plan, Start Investing at Rs 100; Opportunity until September 28 | HDFC ची नवीन योजना, 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक; 28 सप्टेंबरपर्यंत संधी

HDFC ची नवीन योजना, 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक; 28 सप्टेंबरपर्यंत संधी

Mutual Fund NFO: अॅसेट मॅनेजमेंट कंपनी HDFC म्युच्युअल फंड (HDFC Mutual Fund)ने इक्विटी सेगमेंटमध्ये नेवीन सेक्‍टोरल फार्मा फंड (NFO) आणला आहे. फंड हाउसच्या एनएफओ HDFC Pharma and Healthcare Fund चे सब्सक्रिप्‍शन 14 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. या योजनेसाठी गुंतवणूकदार 28 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. ही एक ओपन एंडेड योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवे तेव्हा रिडम्प्शन करू शकतात. कंपनीच्या मते, ही योजना दीर्घकालीन भांडवल वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते.

तुम्ही ₹100 पासून गुंतवणूक सुरू करू शकता
एचडीएफसी म्युच्युअल फंडनुसार, तुम्ही एचडीएफसी फार्मा आणि हेल्थकेअर फंडमध्ये किमान रु 100 आणि त्यानंतर रु 1 च्या पटीत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेमध्ये 1 वर्षाच्या आत रिडेम्पशनवर 1 टक्के एक्झिट लोड भरावा लागेल. या योजनेचा बेंचमार्क S&P BSE हेल्थकेअर आहे. या योजनेचे निधी व्यवस्थापक(फंड मॅनेजर) निखिल माथूर आहेत. या योजनेत एसआयपीची सुविधादेखील आहे. तुम्ही नियमित आणि थेट, अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता

कोण गुंतवणूक करू शकतो?
म्युच्युअल फंड हाऊसच्या मते, दीर्घ मुदतीसाठी भांडवल वाढीची इच्छा असणारे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत, गुंतवणूकदारांना फार्मा आणि आरोग्य सेवा कंपन्यांच्या इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांमधील गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळविणे हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, योजनेत कोणत्याही प्रकारची हमी नाही. 

(डिस्‍क्‍लेमर: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. इथे आम्ही फक्त म्युच्युअल फंड NFOची माहिती दिली आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. )

Web Title: HDFC MFs New Plan, Start Investing at Rs 100; Opportunity until September 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.