Join us

काय सांगता! शेअर मार्केटसारखा परतावा आता FD मध्ये; 'ह्या' 3 योजना करतील श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:47 AM

Highest Fd Rates : अनेक NBFC कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव योजनेवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. तुम्हीही ह्या संधीचा फायदा उचलू शकता.

Highest Fd Rates : सध्या शेअर मार्केटमध्ये तुफान आलं असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत भरगोस वाढ झाली आहे. शेअर बाजारात पाण्यासारखा पैसा असला तरी तो कुणालाही मिळत नाही. त्यासाठी बाजाराची योग्य माहिती आणि अभ्यास हवा. अन्यथा लाखो लोक यामध्ये कंगाल झाल्याचीही उदाहरणे आहेत. जर तुम्हाला हा धोका पत्कारायचा नसेल. पण, परतावाही चांगला हवा असेल तर तुम्ही योग्य लेख वाचत आहात. मुदत ठेव म्हणजेच FD हे गुंतवणुकीचे सुरक्षित आणि पारंपारिक साधन आहे. यामध्ये निश्चित परताव्याची हमी दिली जाते आणि कोणताही धोका नसतो. जर तुम्ही जास्त व्याज असलेली FD योजना शोधत असाल, तर सध्या काही NBFC कंपन्या FD मध्ये सर्वोत्तम व्याजदर ऑफर करत ​​आहेत. यात अगदी शेअर बाजाराप्रमाणे पावणेदहा टक्के वार्षिक परतावाही मिळत आहे.

FD वर ९.४२ टक्के खाजगी क्षेत्रातील NBFC कंपनी १५०० दिवसांच्या FD वर ९.४२ टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे, ७०० दिवसांपासून ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ९.१५ टक्के व्याजदर मिळत आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त आणि चार वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडीवर ८.२५ टक्के ते ९.१५ टक्के व्याज देत आहे. याशिवाय, अधिकृत वेबसाइटनुसार, ७३० दिवसांपासून ते १०९५ दिवसांच्या एफडीवर ८.५० टक्के ते ९.४२ टक्के व्याज दिले जात आहे. तुम्हाला ३६५ दिवस ते ६९९ दिवसांच्या एफडीवर ८.८८ टक्के व्याज मिळू शकते.

८.७५ टक्के पर्यंत परतावाउज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देखील FD वर उत्कृष्ट परतावा देत आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, ही बँक 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. यामध्ये तुम्हाला 12 महिन्यांच्या एफडीवर ८.२५ टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी ८.७५ टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही 12 महिने ते 560 दिवसांची (80 आठवडे) FD केल्यास, बँक तुम्हाला 8.0 टक्के व्याजदर ऑफर करते.

एफडीवर सर्वाधिक व्याजदरNBFC कंपनी श्रीराम फायनान्स सध्या FD वर प्रचंड व्याज देत आहे. कंपनीची सुरुवातीची ऑफर ७.९६ टक्के व्याजापासून सुरू होते, जी १२ महिन्यांच्या FD वर उपलब्ध आहे. आपल्या नवनवीन योजनेमध्ये, कंपनी सामान्य ग्राहकांना ८.९१ टक्के व्याज आणि ५० महिन्यांच्या ज्युबिली डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना ९.४५ टक्के सर्वाधिक व्याजदर देत आहे. तुम्ही ६० महिन्यांसाठी FD केली तरीही तुम्हाला समान व्याजदर दिला जाईल. याशिवाय, कंपनी ४२, ३६, ३० आणि २४ महिन्यांच्या FD वर देखील उत्कृष्ट व्याजदर देत आहे. जर तुम्हाला शेअर बाजारातील जोखीत पत्करायची नसेल तर या एफडी योजनांचा नक्कीच विचार करू शकता.

(Disclaimer- यामध्ये एफडी योजनांची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकबँक