Join us  

या शहरांतील घरेसर्वाधिक फायद्याची; आरबीआयनेच जारी केली यादी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 7:45 AM

१० वर्षांत शहरीकरणाचा वेग ३२ टक्क्यांवरुन ३६ टक्के झाला आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर्स संघटनेच्या महासंघाने अलीकडेच देशातील १० उगवत्या शहरांचा अहवाल जारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर/नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच ‘गृह किंमत निर्देशांक’ (हाउस प्राइस इंडेक्स) जारी केला आहे. त्यात टिअर-१ व टिअर-२ शहरांतील मालमत्तांच्या परताव्याचे आकडे देण्यात आले आहेत. त्यानुसार, कोची शहराने सर्वाधिक मालमत्ता परतावा (प्रापर्टी रिटर्न) दिला असून जयपूर दहाव्या स्थानावर आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये देशातील बँकांचे कर्ज ४० टक्के वाढून ३० लाख कोटी रुपये झाले. यात गृहनिर्माण (हाउसिंग) आणि व्यावसायिक वास्तव संपदा (कमर्शिअल रिअल इस्टेट) या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे.

वास्तव संपदा (रिअल इस्टेट) क्षेत्रात मागील १० वर्षांपासून टिअर-१ शहरांचा दबदबा आहे. मात्र, आता टिअर-२ शहरांनीही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुडगाव, अहमदाबाद, इंदौर, पुणे, जयपूर आणि कोची या टिअर-२ शहरांत मागील ५ वर्षांत मालमत्तांच्या किमती सरासरी ३३ टक्क्यांपर्यंत वाढल्या.

१० वर्षांत शहरीकरणाचा वेग ३२ टक्क्यांवरुन ३६ टक्के झाला आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर्स संघटनेच्या महासंघाने अलीकडेच देशातील १० उगवत्या शहरांचा अहवाल जारी केला. यात भुवनेश्वर, कोइम्बतूर, जयपूर, कोची, लखनौ, नागपूर, सुरत, विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम आणि इंदौर, यांचा समावेश आहे.

आठ प्रमुख रिअल इस्टेट बाजारकॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या माहितीनुसार, देशातील ८ प्रमुख वास्तव संपदा (रिअल इस्टेट) बाजार पुढीलप्रमाणे आहेत-n दिल्ली एनसीआर n मुंबई n बंगळुरू n पुणे n हैदराबाद n चेन्नई n कोलकता n अहमदाबाद

टॅग्स :बांधकाम उद्योग